PM friend Abbas:सापडला.. मोदींच्या बालपणीचा मित्र अब्बासचा पत्ता मिळाला.. तेव्हा मोदींच्या घरी राहत होते, आता कुठे आहेत, घ्या जाणून
अब्बास आता ६४ वर्षांचे झाले आहेत, अशी माहितीही पंकजभाईंनी दिली आहे. ते गुजरात सरकारमध्ये क्लास २ चे अधिकारी होते आणि अन्न आणि पुरवठा विभागात नोकरीला होते, असेही सांगण्यात आले आहे. अब्बास यांनी नोकरीच्या काळात वडनगरमध्ये स्वताचे घर बांधल्याची माहितीही देण्यात आली आहे.
अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त ब्लॉग लिहिला होता. या ब्लॉगमध्ये आईच्या आठवणी, जन्मापासूनचा सगळा वृत्तांत त्यांनी लिहिला होता. याच ब्लॉगमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांचा बालपणीचा मित्र अब्बासचा उल्लेख केला होता. पंतप्रधानांनी लिहिले होते की, त्यांचे वडील दामोदरदास यांचे एक मुस्लीम मित्र होते. या मुस्लीम मित्राच्या मृत्यूनंतर अब्बासला वडिलांनी घरी आणले होते, असा उल्लेख मोदींनी केलेला आहे. अब्बासने मोदी यांच्या घरी राहूनच शिक्षण घेतले आणि ते मोठेही तिथेच झाले. पंतप्रधानांची आई हीराबेन ईडच्या दिवशी अब्बाससाठी खास जेवण तयार करीत असे, अशी आठवणही मोदींनी लिहिली आहे. मोदींच्या ब्लॉगमध्ये अब्बास यांचा उल्लेख आल्यानंतर, अब्बास यांचा शोध अचानकपणे सुरु झाला. पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला ते अब्बास नेमके आहेत तरी कोण, हा प्रश्न अनेकांना पडला. अब्बास नेमके आता कुठे आहेत, हे माहीत नसल्याचा उल्लेख मोदींनी केला होता, त्यामुळे मग आता अब्बास कुठे आहेत, याचा शोध सुरु झाला.
आधी अब्बास यांचा फोटो आला समोर
आता अब्बास यांचा उल्लेख झाल्यानंतर एका व्यक्तीचा फोटो समोर आला आहे. पंतप्रधानांचे भाऊ पंकजभाई यांनी सांगितले की अब्बास त्यांच्यासोबत एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत होता. या अब्बास यांचे पूर्ण नाव अब्बास मियाभाई मोमीन असे आहे, असे सांगण्यात येते आहे.
This is #Abbas Bhai, whom PM @narendramodi mentioned in his blog today. Abbasbhai has retired from Gujarat govt s food and civil supplies department and lives in #Sidney #Australia with his family. PM Modi recalled him in his blog that he wrote on his mother’s 100th birthday. pic.twitter.com/ur60eiphkw
— Deepal.Trivedi #Vo! (@DeepalTrevedie) June 18, 2022
पंकजभाईंसोबत घेत होते शिक्षण
अब्बास ज्या गावात राहत होता, त्या ठिकाणी शाळा न्वहती, असे पंकजभाईंनी सांगितले आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर अब्बास यांचे शिक्षण सुटले असते म्हणून वडिलांनी अब्बासला मोदींच्या घरी आमल्याचे पंकजभाईंनी सांगितले आहे. अब्बास यांनी मोदींच्या कुटुंबीयांबरोबर राहून आठवी आणि नववीचे शिक्षण पूर्म केले असेही पंकजभाई यांनी सांगितले आहे.
क्लास टू ऑफिसर म्हणून निवृत्त झाले
अब्बास आता ६४ वर्षांचे झाले आहेत, अशी माहितीही पंकजभाईंनी दिली आहे. ते गुजरात सरकारमध्ये क्लास २ चे अधिकारी होते आणि अन्न आणि पुरवठा विभागात नोकरीला होते, असेही सांगण्यात आले आहे. अब्बास यांनी नोकरीच्या काळात वडनगरमध्ये स्वताचे घर बांधल्याची माहितीही देण्यात आली आहे.
वडनगरमध्ये कुटुंब
अब्बास यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा वडनगरच्या कम्पिसा गावात राहतो. तर छोटा मुलगा ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात आहे. निवृत्तीनंतर आता अब्बास ऑस्ट्रियात त्यांच्या मुलाकडे सिडनी येथे मुक्कामी आहेत.
सिडनीत मुलाकडे रहातायेत अब्बास
मोदींचे भाऊ पंकजभाई यांनी सांगितले की, त्यांची आई हिराबेन यांनी स्वताच्या मुलांप्रमाणे अब्बास यांचा सांभाळ केला. ईदच्या दिवशी त्यांच्या आवडीचे जेवण घरी तयार करण्यात येत असे. तर मोहरमच्या दिवशी त्यांना काळे कपडे घालण्यासाठी मिळत असत. अब्बास हा अतिशय प्रामाणिक आणि सरळमार्गी होते, असेही त्यांनी सांगितले. दिवसातून पाच वेळा अब्बाज नमाज पठण करीत असत असेही पंकजभाईंनी सांगितले आहे. मोठे झाल्यानंतर अब्बास यांनी हज यात्राही केल्याचे पंकजभाईंनी सांगितले आहे.