Encounter in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे चकमकीत चार दहशतवादी ठार
बारामुल्ला : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामध्ये पोलिस आणि सुरक्षा दलाच्यात आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. त्यावेळी परिसराला पोलिस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला होता. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचा चार दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. तसेच परिसारात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या […]
बारामुल्ला : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामध्ये पोलिस आणि सुरक्षा दलाच्यात आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. त्यावेळी परिसराला पोलिस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला होता. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचा चार दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. तसेच परिसारात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने संयुक्त शोध मोहीम होती घेतली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याच्या प्रत्यूत्तरात सुरक्षा दलाने गोळीबार केला. त्यात लष्कर-ए-तैयबाचा चार दहशतवाद्यांना ठार झालेत. तर एक नागरिकही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या चकमकीत टॉप 10 मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत असलेला एलईटी कमांडर युसूफ कांतरू हा देखील ठार झाला आहे.
घेराबंदी आणि शोध मोहीम
मिळालेल्या माहितीनुसार, लष्करासह बडगाम पोलिसांच्या विशेष पथकाने मालवाह परिसरात संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान संयुक्त शोध दल संशयित ठिकाणी पोहोचताच लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात एका अधिकाऱ्यासह चार जवान किरकोळ जखमी झाले. या गोळीबाराला प्रभावीपणे प्रत्युत्तर सुरक्षा दलाने दिल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. नंतर एसएसपी बारामुल्ला यांच्या नेतृत्वाखाली बारामुल्ला पोलीसही या कारवाईत सामील झाले. बारामुल्ला जिल्ह्यातील एक पोलीसही चकमकीत जखमी झाला. त्याला श्रीनगर येथील लष्कराच्या बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
दहशतवादी युसूफ कांतरू
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी युसूफ कांतरू याआधी हिजबुल मुजाहिद्दीन (एचएम) संघटनेचा ओव्हरग्राउंड वर्कर म्हणून सामील झाला होता. त्याला २००५ मध्ये अटक करण्यात आली होती. तर 2008 मध्ये त्याची सुटका झाली. परंतु 2017 मध्ये तो पुन्हा दहशतवादी कारवायात सामील झाला. त्यानंतर तो निष्पाप नागरिक, पोलीस आणि राजकीय कार्यकर्त्यांची हत्या करू लागला. मात्र अन्य ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त
पोलिसांच्या नोंदीनुसार, मारले गेलेले दहशतवादी हे वर्गीकृत दहशतवादी आणि पोलिस आणि सुरक्षा दलांवर हल्ले आणि नागरी अत्याचारांसह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गटांचा भाग होते. चकमकीच्या ठिकाणाहून आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेले सर्व साहित्य पुढील तपासासाठी केस रेकॉर्डमध्ये घेण्यात आले आहे. अजूनही कारवाई सुरू आहे.
Jammu and Kashmir | Four terrorists have been killed in an ongoing encounter that started yesterday (April 21) between terrorists and security forces in Baramulla area
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/h9whxy8eBy
— ANI (@ANI) April 22, 2022
Four terrorists killed in ongoing encounter in J-K’s Baramulla
Read @ANI Story | https://t.co/5uCaqYjNm0#JammuAndKashmir #BaramullaEncounter pic.twitter.com/Wvw0rQyIz2
— ANI Digital (@ani_digital) April 22, 2022