टीव्ही9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा आज चौथा दिवस; दसऱ्याच्या निमित्ताने खास कार्यक्रम काय?
टीव्ही9 नेटवर्कच्या फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा आज चौथा दिवस आहे. या फेस्टिव्हलमध्ये 250हून अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत. देश विदेशातील व्यापाऱ्यांच्या या स्टॉलवर जगातील वस्तू खरेदी करण्याचा हा उत्तम योग आहे. आज चौथ्या दिवशी फेस्टिव्हलमध्ये लहान मुले आणि बुजुर्गांवर अधिक फोकस करण्यात आला आहे.
दिल्लीकरांना खिळवून ठेवणाऱ्या टीव्ही9 नेटवर्कच्या फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा आज चौथा दिवस आहे. दुर्गा पूजेच्या पावन पर्वाववर या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलला गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आज फेस्टिव्हलचा चौथा दिवस आहे. योगायोगाने आज दसराही असल्याने या फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा आजचा दिवस केवळ जल्लोषाचाच नव्हे तर उत्साहाचाही ठरणार आहे.
टीव्ही9 नेटवर्कच्या फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये आलेल्या लोकांमध्ये उल्हास आणि उत्साह आहे. या फेस्टिव्हलचं वैशिष्ट्ये म्हणजे तरुणांपासून बुजुर्गांपर्यंत आणि महिला वर्गापर्यंत सर्वच जण येत आहे. त्यामुळेच तरुणांपासून वृद्धांसाठीच्या अॅक्टिव्हिटीज या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. टीव्ही9 नेटवर्ककडून पाच दिवस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज त्याचा चौथा दिवस आहे. उद्या या फेस्टिव्हलची सांगता होणार आहे. त्यामुळे आजच या फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे.
आज काय असेल?
गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड उत्साहात हा फेस्टिव्हल साजरा होत आहे. या फेस्टिव्हलला प्रचंड गर्दी होत आहे. आजचा चौथा दिवसही अत्यंत खास आहे. फेस्टिव्हलच्या समारोपाच्या आधीचा हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 12 ऑक्टोरबर रोजी म्हणजे आज नवमी पूजेने दिवसाची सुरुवात झाली. सकाळी 8.30 वाजता पूजा करण्यात आली. सकाळी 10 वाजता पुष्पांजली पार पडली. त्यानंतर 10.30 वाजता भोग निवेदन करण्यात आलं.
सकाळी 11 वाजता मंगलकामनेसाठी हवन करण्यात आलं. त्यानंतर 11.30 वाजता चंडी पाठ करण्यात आला. पाठानंतर दुपारी 1.30 वाजता प्रसादाचं वितरण करण्यात येणार आहे. आज रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत संध्या आरती केली जाणार आहे. त्यात लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मुलांसाठी खास नियोजन
फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा आजचा चौथा दिवस लहान मुलांसाठीच असणार आहे. आजच्या दिवशी लहान मुलांसाठी अधिकाधिक अॅक्टिव्हिटीज करण्यात आल्या आहेत. ड्रॉइंगपासून ते डान्स आणि फॅन्सी ड्रेसपासून तर अनेक विविध खेळापर्यंतचं नियोजन आज करण्यात आलं आहे. त्याशिवाय या ठिकाणी आनंद मेळाही असणार आहे. या आनंद मेळ्यात भारताची संस्कृती दिसणार आहे.
लोकांना एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे. घरातून येताना खाण्याचा खास पदार्थ घेऊन या असं सांगण्यात आलं आहे. आजी-पणजीची खास रेसिपीही आणू शकता. किंवा आईच्या हातचा बनवलेला पदार्थ आणि किंवा तुमचा स्वत:चा स्टॉल लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एकंदरीत आजचा दिवस हा भक्तीसंगमाचा आहे. लहान मुलांच्या अल्लडपणाचा असणार आहे.
खाण्यापिण्याची रेलचेल
या फेस्टिव्हलमध्ये खाण्यापिण्याचीही रेलचेल असणार आहे. या ठिकाणी खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉलही लावण्यात आले आहेत. पंजाबी खाद्यपदार्थापासून बिहारचा लिट्टी चोखे, लखनऊचे कबाब, महाराष्ट्राची पाव भाजी, राजस्थानचे पक्वान्नही ठेवण्यात आले आहेत. या शिवाय दिल्लीची पाणीपुरी आणि चाटसोबत चायनिजही ठेवण्यात आले आहेत.