किडनी रुग्णांनी लक्ष द्या! मोदी सरकारचा ‘राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम’, मोफत होणार उपचार
आयुष्मान भारत योजना जन औषधी योजना आणि राष्ट्रीय डायलिसिस प्रोग्राम या अशा योजना आहेत. ज्याबद्दल नागरिकांना फारशी माहिती नाही.
नवी दिल्ली : देशातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत सरकार अनेक योजना आणत असतं. अशातच आता मोदी सरकारने एक महत्त्वाची योजना आणली आहे. खरतंर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी आसामच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी भाषणात आयुष्मान भारत, जन औषधी केंद्र आणि पंतप्रधान राष्ट्रीय डायलिसिस प्रोग्रामसह अनेक लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. (free dialysis treatment offer by pm modi govt with pradhanmantri national dialysis programme)
काय आहे डायलिसिस प्रोग्राम ?
पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष्मान भारत योजना जन औषधी योजना आणि राष्ट्रीय डायलिसिस प्रोग्राम या अशा योजना आहेत. ज्याबद्दल नागरिकांना फारशी माहिती नाही. केंद्र सरकारकडून राबवण्यात आलेल्या या योजनेचा फायदा किडनी रूग्ण घेऊ शकतात ज्यांना डायलिसिसची गरज आहे. या योजनेबद्दल सगळ्यात महत्त्वाचं आणि खास म्हणजे यासाठी रुग्णाला कुठेही लांब जाण्याची गरज नाही. कारण सरकारने जिल्हा पातळीवर या योजनेची व्यवस्था केली आहे.
आयुष्मान भारत योजना हो, जन औषधि केंद्र हो, प्रधानमंत्री नेशनल डायलिसिस प्रोग्राम या हेल्थ एंड वेलनेस केंद्र हो,
सामान्य मानवी के जीवन में जो बदलाव आज पूरा देश देख रहा है वही बदलाव, वही सुधार असम में भी दिख रहे हैं।
– पीएम श्री @narendramodi #NaMoWithNewAssam pic.twitter.com/kcgcsNciEb
— BJP (@BJP4India) February 7, 2021
देशातील बहुतेक जिल्हा रूग्णालयात राष्ट्रीय डायलिसिस प्रोग्रामअंतर्गत किडनीचा त्रास असणाऱ्या रुग्णांना डायलिसिसची सुविधा दिली जात असून केंद्राचा हा कार्यक्रम सार्वजनिक आणि खाजगी भागीदार (पीपीपी) पद्धतीने चालवला जात आहे. देशातील बऱ्याचश्या जिल्हा रूग्णालयात या प्रोग्रामला सुरुवात झाली आहे. इथं गरीब रूग्णांना मोफत किंवा अनुदानाच्या आधारे डायलिसिसची सुविधा दिली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 2016 मध्ये सुरू झालेल्या या प्रोग्रामचा आतापर्यंत लाख रुग्णांनी लाभ घेतला आहे.
अनेक राज्यांना मिळत आहे लाभ
या कार्यक्रमाअंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, पंजाब, केरळ, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांवर डायलिसिसची सुविधा देण्यात येत आहे. संपूर्ण देशामध्ये यासाठी 4 हजारहून अधिक मशीनें लावण्यात आली आहेत. अधिक माहितीनुसार, गुजरातमध्ये सगळ्यात जास्त रुग्णांनी सरकारच्या या योजनेचा लाभ घेतला आहे.
खासगी रुग्णालयामध्ये डायलिसिसचा खर्च अडीच हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे. मूत्रपिंडाच्या आजाराच्या त्रासामुळे आठवड्यातून दोनदा रुग्णांना डायलिसिस घ्यावा लागतो. त्यामुळे गरीब रूग्णांसाठी हे महाग आहे. यामुळे केंद्र सरकारने जिल्हा पातळीवर राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम सुरू करून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल आहे.
देशात किती आहे किडनी रुग्ण?
समोर आलेल्या एका आकडेवारीनुसार, देशात प्रत्येकवर्षी 2.2 लाख नवीन रुग्ण समोर येत आहेत. रूग्णांची ही वाढती संख्या लक्षात घेता दरवर्षी 4.4 कोटी डायलिसिस आवश्यक असतात. म्हणूनच देशात अनेक हजार डायलिसिस सेंटर सध्या सुरू आहेत. पण तरीदेखील मागणीनुसार पुरवठा होत नाही. या रुग्णांना दर आठवड्याला डायलिसिस करावं लागतं. यामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे लाखो रुपये यामध्ये खर्च होतात. त्यामुळे सरकारची ही योजना लाभदायक आहे. (free dialysis treatment offer by pm modi govt with pradhanmantri national dialysis programme)
संबंधित बातम्या –
उत्तराखंडनंतर निसर्गाचा आणखी एक धोका, जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके
भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचलं जातंय : पंतप्रधान मोदी
बंगालमध्ये टीएमसी, डावे आणि काँग्रेसची मॅच फिक्सिंग, मोदींच्या घणाघातानं दिदी घायाळ
(free dialysis treatment offer by pm modi govt with pradhanmantri national dialysis programme)