काय म्हणताय, आता चक्क मुलींना मिळणार मोफत इलेक्ट्रीक स्कुटी

महिला दिनानिमित्त नाही तर एका सरकारी योजनेत मुलींना मोफत इलेक्ट्रीक स्कुटी देण्यात येणार आहे. या योजनेत ३० हजार विद्यार्थीनी पात्र ठरणार आहे.

काय म्हणताय, आता चक्क मुलींना मिळणार मोफत इलेक्ट्रीक स्कुटी
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 11:08 AM

जयपूर : 8 मार्च जवळ आला आहे. विविध कंपन्या किंवा राज्य सरकारकडून महिला दिनानिमित्त विविध घोषणा केल्या जातात. महिलांनी कुठे सवलती मिळतात तर कुठे काहीतरी मोफतही. यामुळेच 8 मार्च निमित्त कुठे काय ऑफर आहे, याचा शोध महिला व मुलींनी सुरु केला आहे. परंतु महिला दिनानिमित्त नाही तर एका सरकारी योजनेत मुलींना मोफत इलेक्ट्रीक स्कुटी देण्यात येणार आहे. राजस्थान सरकारने मुलींना मोफत स्कुटी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली आहे. या योजनेत ३० हजार विद्यार्थीनी पात्र ठरणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व मुलींना आनंद झाला आहे.

राजस्थान सरकार काळीबाई भील योजनेत, १२वीत ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण आणणाऱ्या मुलींना स्कुटी देणार आहे. यापूर्वी २० हजार स्कुटी वाटपाचे सरकारचे उद्दिष्ट होते. आता बजेटमध्ये त्याची संख्या 10 हजार वाढवून 30 हजार करण्यात आली आहे.

महिलांचा प्रवास स्वस्त

हे सुद्धा वाचा

राजस्थान रोडवेजमध्ये महिलांचा प्रवास आता स्वस्त झाला आहे. बजेटमध्ये भाड्यात 50 टक्के सूट देण्यात आली आहे. यापूर्वी ही सूट 30 टक्के होती. म्हणजेच पूर्वी महिलांना 70 टक्के भाडे भरावे लागत होते. आता ते निम्म्यावर आले आहे. त्याचबरोबर महिलांना त्यांच्या घरापासून कार्यालये आणि औद्योगिक भागात नेण्यासाठी महिला विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे. हा सरकारचा चालू असलेला प्रकल्प आहे.

मुले-मुलींना मोफत प्रवास

सरकारी शाळांमध्ये ट्रान्सपोर्ट व्हाउचर योजना सुरू होणार आहे. याअंतर्गत मुलांना घर ते शाळा आणि शाळा ते घर असा 75 किलोमीटरचा प्रवास मोफत करता येणार आहे. या योजनेचा अनेक मुले व मुलींना होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.