दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य, मोदी सरकारची मोठी घोषणा

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनाच्या संकटात काहीसा दिलासा मिळालाय. PM Narendra Modi

दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य, मोदी सरकारची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 5:59 PM

नवी दिल्लीः दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य देणार असल्याची मोठी घोषणा मोदी सरकारनं केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज जनतेला संबोधित केलंय. त्यावेळी त्यांनी हे सांगितलंय. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनाच्या संकटात काहीसा दिलासा मिळालाय. (Free Food To The Poor Till Diwali, Big Announcement Of Modi Government)

नोव्हेंबरपर्यंत 80 कोटींहून अधिक देशवासीयांना दरमहा निश्चित प्रमाणात मोफत धान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित करताना अनेक घोषणा केल्या. कोरोना साथीच्या संकटाच्या काळात सरकार गरिबांच्या मदतीसाठी उभे राहील. म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत 80 कोटींहून अधिक देशवासीयांना दरमहा निश्चित प्रमाणात मोफत धान्य मिळणार आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलंय.

लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल

भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं सांगतानाच आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

खासगी रुग्णालयात 150 रुपयात लस

येत्या 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल, खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार असतील तर त्यांना 25 टक्के लसी उपलब्ध असतील. खासगी रुग्णालयात 150 रुपये भरून लस घेता येईल, असं मोदींनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

PM Narendra Modi Live : 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्त गाव योजनेसाठी मुख्यमंत्र्यांची नाशिक आणि कोकण विभागातील सरपंचांशी चर्चा

Maharashtra News LIVE Update | नाणार विभागातील 11 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या, उदय सामंत यांचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला 

Free Food To The Poor Till Diwali, Big Announcement Of Modi Government

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.