वक्फ मालमत्ता ते मणिपूर हिंसाचार, अमित शाह यांनी सांगितला पंतप्रधान मोदींचा प्लान

मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच परराष्ट्र धोरणात पाठीचा कणा दिसत आहे. पंतप्रधान मोदींची वन नेशन वन इलेक्शन ही महत्त्वाकांक्षी योजना तिसऱ्या टर्ममध्येच अंमलात आणली जाईल, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले.

वक्फ मालमत्ता ते मणिपूर हिंसाचार, अमित शाह यांनी सांगितला पंतप्रधान मोदींचा प्लान
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 1:10 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाबाबत बोलताना अमित शाह यांनी सर्वच मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील कामांचा गृहमंत्री अमित शहा यांनी पाढाच वाचून दाखवला. समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेऊन विकास आणि गरीब कल्याणाचा अद्भुत समन्वय करत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी गरीब, महिला, शेतकरी, युवक, महिला आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उचललेल्या पावलांची सविस्तर माहिती दिली.

वक्फ कायद्यात सुधारणा

शाह यांनी मोदी 3.0 मध्ये वक्फ कायद्यातील सुधारणांचाही समावेश केला, वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. यासंबंधीचे विधेयक लवकरच संसदेत मंजूर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वक्फ कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात क्यूआर कोडद्वारे चालवल्या जात असलेल्या मोहिमेबद्दल विचारले असता, अमित शहा म्हणाले की जेपीसी या समस्येची दखल घेण्यास सक्षम आहे आणि वास्तविक सूचना आणि मोहीम यातील फरक ओळखून सुधारणांवर निर्णय घेईल.

मणिपूर हिंसाचारावर कारवाई

मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात मोदी सरकारवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की सरकार कायम शांततेसाठी मीतेई आणि कुकी समुदायांशी चर्चा करत आहे. म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालण्यात झालेली प्रगती, मणिपूर समस्येचे मूळ आणि सीमेपलीकडून होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलेचा तपशीलही त्यांनी दिला.

100 दिवसांच्या कामाचा अहवाल

मणिपूर हिंसाचाराचा दहशतवादाशी संबंध टाळण्याचा सल्ला देत ते म्हणाले की ही जातीय हिंसा आहे आणि दोन्ही समुदायांना विश्वासात घेऊनच ती कायमची शांत होऊ शकते.

मोदी 3.0 च्या 100 दिवसांचा गेल्या 10 वर्षांच्या कार्याच्या सातत्यांशी संबंध जोडताना अमित शाह म्हणाले की, अमृत काळात विकसित भारताच्या उभारणीत 140 कोटी देशवासीयांना सहभागी करून घेण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी ठरले आहेत.

अमित शाह म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत त्यांनी अर्थव्यवस्थेच्या सर्व 13 पॅरामीटर्सवर संतुलित वाढ पाहिली आहे. शाह म्हणाले की, कोरोनामुळे पुढे ढकललेली २०२१ च्या जनगणनेची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.