G-20: अमेरिका ते ब्रिटेन… भारतात येण्याआधीच काय म्हणाले इतर देशांचे प्रमुख पाहा

| Updated on: Sep 07, 2023 | 5:49 PM

G20 Summit : भारतात येण्याआधीच अनेक देशाच्या प्रमुखांनी भारताचे कौतूक केले आहे. भारत हा जागतिक लीडर म्हणून उदयास येत असल्याचं अनेक देशांनी म्हटले आहे.

G-20: अमेरिका ते ब्रिटेन... भारतात येण्याआधीच काय म्हणाले इतर देशांचे प्रमुख पाहा
Follow us on

G-20 Summit 2023 : G-20 शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली आहे. जगातील अनेक देशांचे प्रमुख 9 आणि 10 सप्टेंबर रोजी येथे उपस्थित राहणार आहेत. भारत सध्या G-20 चे अध्यक्षपद भूषवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एका वर्षात अनेक बैठका झाल्या आहेत आणि आता G-20 शिखर परिषदेने या बैठका संपतील. एकीकडे चीन आणि रशियाचे प्रमुख या बैठकीला येणार नाहीयेत. दुसरीकडे जगातील अनेक देशांना भारताला अध्यक्षपद दिल्याने समाधान व्यक्त केले आहे.

एकीकडे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या शिखर परिषदेला येण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, G-20 चे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी भारत योग्य वेळी योग्य देश म्हणून उदयास आला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करतो, भारताने गेल्या एका वर्षात जागतिक नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. जगाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि जागतिक अर्थव्यवस्था आणि हवामान बदलासारख्या समस्यांवर आम्ही भारतासोबत एकत्र काम करू.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, या शिखर परिषदेसाठी खूप उत्सुक आहे. यासोबत त्यांनी चीनवर ही निशाना साधला आहे.

ऑस्ट्रेलिया पीएम अल्बानीज: ऑस्ट्रेलिया सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की ऑस्ट्रेलिया भारताच्या G-20 अध्यक्षपदाचे समर्थन करतो आणि त्याचे सर्व मुद्दे स्वीकारतो, तसेच त्याच्या वतीने पूर्ण सहकार्य करतो.

चीन आणि रशियाची भूमिका काय?

चीन आणि रशिया हे असे मोठे देश आहेत ज्यांचे राष्ट्रप्रमुख G-20 शिखर परिषदेत सहभागी होणार नाहीत. चीनचे पंतप्रधान मात्र हजेरी लावणार आहेत. तर रशियाचे परराष्ट्र मंत्री राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जागी येतील. रशियाने स्पष्ट केले आहे की ते अशा कोणत्याही संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करणार नाहीत, ज्यामध्ये युक्रेनच्या मुद्द्यावर आपली भूमिका उघडपणे मांडली जाणार नाही.

भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 शिखर परिषद आयोजित केली जात आहे. ही शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार आहे, ज्यामध्ये दोन डझनहून अधिक देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेसाठी नवी दिल्ली सजली असून अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. दिल्लीत 8 ते 10 सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. याशिवाय अनेक वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले असून मेट्रोच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.