G-20: कोणार्क चक्राच्या समोर PM मोदी यांनी के जगभरातील नेत्यांचे स्वागत, काय आहे त्याचे महत्त्व?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपम येथे G-20 शिखर परिषदेसाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले तेव्हा त्यांनी जगाला भारताच्या संस्कृतीशी संबंधित आणखी एका प्रतीकाची ओळख करून दिली.

G-20: कोणार्क चक्राच्या समोर PM मोदी यांनी के जगभरातील नेत्यांचे स्वागत, काय आहे त्याचे महत्त्व?
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 11:19 PM

G-20 Summit, 9 सप्टेंबर 2023 : भारतातील दिल्ली येथे G-20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे. सगळीकडे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तर आहेच पण सजावट देखील करण्यात आली आहे. जगभरातील अनेक देशांचे प्रमुख दिल्लीत आले आहेत. यावेळी भारताच्या संस्कृतीचे दर्शन त्यांना होत आहे. या सगळ्यामुळे कार्यक्रमाच्या सौंदर्यात तर भर पडत आहेच, पण भारताची समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा जाणून घेण्याची संधीही जगाला मिळत आहे. भारताला आपली संस्कृती दाखवण्याची यापेक्षा चांगली संधी मिळू शकत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत मंडपम येथे परदेशी पाहुण्यांचे स्वागत केले तेव्हा मागे ओडिशाचे कोणार्क चक्राची प्रतिमा लावण्यात आली आहे. याबाबत पंतप्रधान मोदींनी पाहुण्यांना माहिती देखील दिली.

हे कोणार्क चक्र 13व्या शतकात नरसिंहदेव-1 च्या कारकिर्दीत बांधले गेले आहे. हे चक्र भारताच्या प्राचीन ज्ञान, सभ्यता आणि स्थापत्यशास्त्राच्या श्रेष्ठतेचे प्रतीक आहे. कोणार्क चक्राचे आवर्तन काळाचक्र सोबत प्रगती आणि सतत बदलाचे प्रतीक आहे. हे लोकशाहीच्या चाकाचे शक्तिशाली प्रतीक म्हणूनही काम करते. हे लोकशाही आदर्श आणि समाजातील प्रगतीची बांधिलकी प्रतिबिंबित करते.

हे चक्र कोणार्क येथील बांधलेल्या सूर्य मंदिरात बांधले आहे. भारतीय चलनी नोटांवरही कोणार्क चक्र छापलेले असते. एकेकाळी 20 रुपयांच्या नोटेवर छापले जायचे आणि नंतर 10 रुपयांच्या नोटेवर छापले जायचे. चाकामध्ये 8 रुंद स्पोक आणि 8 पातळ स्पोक आहेत. मंदिरात 24 (12 जोड्या) चाके आहेत. हे सूर्याच्या रथाच्या चाकांचे प्रतिनिधित्व करतात. 8 काठ्या दिवसाचे 8 तास सांगतात. असे मानले जाते की याचा वापर करून, सूर्याच्या स्थितीनुसार वेळ मोजली जाते. चाकाचा आकार 9 फूट 9 इंच आहे. असेही मानले जाते की चाकांच्या 12 जोड्या वर्षाचे 12 महिने दर्शवतात आणि 24 चाके दिवसाचे 24 तास दर्शवतात.

शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.