Gaganyaan Mission Astronauts | अवकाशात जाणारे भारताचे ‘ते’ चार एस्ट्रोनॉट्स आले सर्वांसमोर

Gaganyaan Mission Astronauts | मिशन चांद्रयान, मिशन आदित्य नंतर भारताच दुसर महत्त्वकांक्षी मिशन आहे, 'गगनयान'. या मिशनमधील चारही अवकाशवीर प्रथमच जगासमोर आले आहेत. त्या चौघांची नाव समोर आली आहेत.

Gaganyaan Mission Astronauts | अवकाशात जाणारे भारताचे 'ते'  चार एस्ट्रोनॉट्स आले सर्वांसमोर
Gaganyaan Mission Astronauts
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 2:08 PM

Gaganyaan Mission Astronauts | भारताच्या महत्त्वकांक्षी मिशन गगनयानमधील चार एस्ट्रोनॉट्सची नाव समोर आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही एस्ट्रोनॉट्सना एस्ट्रोनॉट विंग्स घातले. हे चौघेही इंडियन एअर फोर्सचे टेस्ट पायलट्स आहेत. ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला अशी त्या चौघांची नाव आहेत. हे चौघेही अनुभवी वैज्ञानिक आहेत. या चौघांनी प्रत्येक प्रकारच फायटर जेट उडवलं आहे. प्रत्येक फायटर जेटची कमतरता आणि वैशिष्ट्य त्यांना माहिती आहे. म्हणूनच या चौघांना गगनयान एस्ट्रोनॉट ट्रेनिंगसाठी निवडण्यात आलय. सध्या बंगळुरुत एस्ट्रोनॉट ट्रेनिंग केंद्रात चौघांच प्रशिक्षण सुरु आहे.

गगनयान मिशनसाठी शेकडो वैमानिकांची चाचणी झाली. त्यानंतर एकूण 12 वैमानिकांची निवड झाली. हे 12 पहिल्या लेव्हलवर आले. त्यांचं सिलेक्शन इंस्टीट्यूट ऑफ एयरोस्पेस मेडिसिन (IAM) मध्ये झालं. त्यानंतर अनेक राऊंडची सिलेक्शन प्रोसेस झाली. त्यानंतर ISRO आणि IAF ने या चौघांची नाव निश्चित केली आहेत. या चौघांना इस्रोने 2020 च्या सुरुवातीला रशियाला पाठवलं होतं. तिथे त्यांना बेसिक एस्ट्रोनॉट ट्रेनिंग मिळालं. कोविड-19 मुळे त्यांच्या प्रशिक्षणाला विलंब झाला. 2021 ला ट्रेनिंग पूर्ण झालं. त्यानंतर या चौघांच सतत ट्रेनिंग सुरु आहे. वेगवेगळ्या प्रकारच हे ट्रेनिंग आहे.

चौघांमधून मिशनसाठी किती जण निवडणार?

इस्रोच्या ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये (HSFC) वेगवेगळ्या प्रकारचे सिमुलेटर्स बसवण्यात येत आहेत. तिथे चौघांची प्रॅक्टिस सुरु आहे. हे चौघेही मिशन गगनयानसाठी जाणार नाही. यातले 2 ते 3 मिशन गगनयानसाठी निवडले जातील.

LVM-3 ला ह्यूमन रेटेड बनवण का आवश्यक?

LVM-3 ला H-LVM3 मध्ये बदलण आवश्यक आहे. म्हणजे पृथ्वीपासून 400 km उंचीवर गोलाकार ऑर्बिटमध्ये क्रू पोहोचू शकेल. इथे H चा अर्थ ह्यूमन रेटेड आहे. रॉकेट नाव HRLV असेल. म्हणजे ह्यूमन रेटेड लॉन्च व्हेइकल.

क्रू एस्केप सिस्टमवर सर्व फोकस

या रॉकेटमध्ये सुरक्षेवर जास्त लक्ष देण्यात येतय. म्हणजेच क्रू एस्केप सिस्टम. म्हणजे कुठलाही धोका निर्माण झाल्यास क्रू मॉड्यूल आपल्या एस्ट्रोनॉट्सला घेऊन पुन्हा सुरक्षित येऊ शकेल. कुठल्याही टप्प्यावर रॉकेटमध्ये काही गडबड झाल्यास एस्ट्रोनॉट्सला सुरक्षित ठेवता येईल. काही इमर्जन्सी आल्यास क्रू मॉड्यूल एस्ट्रोनॉट्सला घेऊन समुद्रात कोसळलं पाहिजे. चार ते पाच प्रकारचे धोके ओळखून वैज्ञानिक त्यावर काम करतायत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.