Afzal Ansari | बसपा खासदार अफजाल अन्सारी यांना 4 वर्षांची शिक्षा, नक्की कारण काय?

अखेर न्यायालयाने या खासदाराला दोषी ठरवत मोठी कारवाई केली आहे. न्यायालयाने या खासदाराला 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जाणून घ्या नक्की प्रकरण.

Afzal Ansari | बसपा खासदार अफजाल अन्सारी यांना 4 वर्षांची शिक्षा, नक्की कारण काय?
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 5:28 PM

लखनऊ | राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी आली आहे. एका प्रकरणात खासदाराला 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. यामुळे या खासदाराला मोठा झटका लागला आहे. इतकंच नाही, तर शिक्षा सुनावल्याने संसदेचं सदस्यत्व म्हणजेच खासदारीकी गमवावी लागण्याची शक्यता आहे. हे नक्की प्रकरण काय आहे आणि कारवाई झालेल्या खासदाराचं नाव आपण सविस्तर जाणून घेऊयात.

गँगस्टर केसमध्ये गाजीपूर एमपी-एमएलए न्यायालयाने बसपा खासदार अफजाल अन्सारी यांना दोषी ठरवलंय. तसेच 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता अन्सारी यांना संसदेचं सदस्यत्वही गमवावं लागू शकतं. याआधी अफजाल यांचे बंधू मुख्तार अन्सारी यांना 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. कृष्णानंद राय हत्या प्रकरणात या दोन्ही बंधूना दोषी ठरवण्यात आलं आहे. शिक्षा सुनावल्यानंतर या दोघांनाही कारागृहात नेण्यात आलं. अफजाल हे बहुजन समाज पक्षाचे गाजीपूर लोकसभा मतदार संघातून खासदार आहे. तर मुख्तार अन्सारी शेजारील जिल्ह्यातील मउ विधानसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा आमदार राहिले आहेत.

नियमांनुसार कोणत्याही खासदाराला 2 पेक्षा अधिक वर्षांची शिक्षा होते, तेव्हा त्याला संसदेचं सदस्यत्व गमवावं लागतं. कृष्णानंद राय हे मोहम्मदाबाद विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तत्कालिन आमदार होते. कृष्णानंद राय आणि त्याच्यांसह 7 जणांवर 29 नोव्हेंबर 2005 मध्ये फायरिंग करण्यात आली होती.

तत्कालिन आमदार कृष्णानंद राय हे 29 नोव्हेंबर 2005 रोजी क्रिकेट सामन्याचं उद्घाटन करुन परतत होते. यावेळेस मुख्तार अन्सारी टोळीच्या कार्यकर्त्यांनी बसनिया चटीजवळ गोळीबार करून आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांची हत्या केली. या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार मुन्ना बजरंगीचे नाव पुढे आले होते. काही वर्षांपूर्वी मुन्ना बजरंगीची तुरुंगात हत्या झाली होती. या प्रकरणात अन्सारी बंधूना आरोपी ठरवण्यात आलं होतं.

या हत्येप्रकरणी 22 नोव्हेंबर 2007 रोजी गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद कोतवाली इथे गँगस्टर चार्टमध्ये खासदार अफजल अन्सारी आणि मुख्तार अन्सारी यांच्यावर गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 23 सप्टेंबर 2022 रोजी दोघांविरुद्ध प्रथमदर्शनी आरोप निश्चित करण्यात आले. फिर्यादीची साक्ष पूर्ण झाली.

त्यानंतर 1 एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणात आधी 15 एप्रिल रोजी निकाल येणार होता. मात्र त्यानंतर तो निकाल 22 एप्रिल रोजी सुनावण्यात येणार होता. दरम्यान आता अफजाल अन्सारी यांच्या संसदेच्या सदस्यत्वाबाबत काय आणि केव्हा निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.