CM Yogi यांच्या यूपीत आणखी एका गुंडाचा एन्काऊंटर, पाहा आता कोणाचा लागला नंबर

उत्तर प्रदेशात गुंडाचा खात्मा सुरुच आहे. गेल्या २३ दिवसात ४ गुंडाचा खात्मा करण्याच यूपी पोलिसांना यश आलंय.

CM Yogi यांच्या यूपीत आणखी एका गुंडाचा एन्काऊंटर, पाहा आता कोणाचा लागला नंबर
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 5:47 PM

लखनऊ : यूपी पोलिसांनी आणखी एका कुख्यात गुंडाचा एन्काऊंटर केला आहे. 23 दिवसांत उत्तर प्रदेशातील तीन मोठ्या माफियांचा खात्मा केला आहे. यूपी एसटीएफने गुरुवारी कुख्यात अनिल दुजाना याचा एन्काऊंटर ( gangster anil dujana encounter ) केला. कुख्यात गुंड अनिल दुजाना याचा मेरठमध्ये एन्काऊंटर झाला आहे. यूपी एसटीएफ आणि अनिल दुजाना टोळी यांच्यात थेट चकमक झाली, ज्यामध्ये अनिल दुजाना ठार झाला. 12 एप्रिलपासून माफियांना ठार करण्याचा सिलसिला सुरुच आहे. अनिल दुजाना याच्यावर अडीच लाखांचे बक्षीस होते. या दरम्यान गुंड आदित्य राणा याला पोलिसांनी चकमकीत प्रथम ठार केले. यानंतर 13 एप्रिल रोजी यूपी पोलिसांनी अतिक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना आणखी एका चकमकीत ठार मारले. दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत माफियांना मातीत गाडू असे म्हटले होते.

गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्ये अनिल दुजाना याची दहशत होती. आठवडाभरापूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातून सुटका होताच त्याने गौतम बुद्ध नगरमध्ये आपल्या विरोधात साक्ष देणाऱ्या लोकांना धमकावले. यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते आणि एका चकमकीत एसटीएफने त्याला चकमकीत ठार केले.

आदित्य राणा

23 ऑगस्ट 2022 रोजी आदित्य शाहजहानपूरमधील ढाब्यातून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. यानंतर 12 एप्रिल रोजी रात्री उशिरा बुऱ्हाणपूर येथे पोलीस आणि आदित्य राणा यांच्यात चकमक झाली. या चकमकीत आदित्य राणा जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुख्यात गुन्हेगार आदित्य राणाविरुद्ध 6 खुनाचे आणि 13 दरोड्याच्या गुन्ह्यांसह 47 गुन्हे दाखल आहेत. अडीच लाखांचे बक्षीस आदित्य राणावर होते. अलीकडेच पोलिसांनी त्याच्या टोळीतील ६ जणांना अटकही केली होती.

असद आणि गुलाम

उमेश पाल हत्येप्रकरणी यूपी पोलीस असद आणि गुलाम या दोघांचाही शोध घेत होते. ते बराच काळ फरार होते, त्यामुळे दोघांवर पाच लाख रुपये बक्षीस होते. 13 एप्रिल रोजी झाशी येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोघांनाही ठार केले. असद हा माफिया अतिक अहमदचा मुलगा होता. उमेश पाल हत्येप्रकरणी असदवर शूटर्ससोबत कट रचल्याचा आरोप होता.

अनिल दुजाना

18 खून आणि 62 गंभीर गुन्ह्यातील आरोपी कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना याला यूपी एसटीएफने ठार केले आहे दुजाना खून, खंडणी, दरोडा, जमीन हडप करणे, सुपारी घेऊन खून करणे, टोळी चालवत असे. दुसरा गुंड सुंदर भाटी जो सध्या तुरुंगात आहे, दुजाना हा त्याचा कट्टर शत्रू होता. भाटी यांच्यावर दुजानाने एके ४७ ने हल्ला केला होता. तिहेरी हत्याकांडात दुजानाचाही सहभाग होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.