पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच, पुण्यातून अटक केलेल्या शूटर महाकाळचा नीकटवर्तीय हत्येत सामील

याच प्रकरणात पुण्यात महाकाळ याला अटक करण्यात आली आहे. सिद्धेश हीरामल कांबळे उर्फ महाकाळ याचा नीकटवर्तीय सिद्धू याच्या हत्येत सहभागी होता, अशी माहिती धालीवाल यांनी दिली आहे. महाकाळचा हा साथीदार अद्याप फरार आहे. त्याचा महाराष्ट्रात आणि देशात शोध घेण्यात येतो आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मास्टरमाइंड गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच, पुण्यातून अटक केलेल्या शूटर महाकाळचा नीकटवर्तीय हत्येत सामील
Lawrence mastermind
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jun 08, 2022 | 10:01 PM

दिल्ली – तिहार जेलमध्ये (Tihar Jail)बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Gangster Lawrence Bishnoi)हाच, पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi singer Sidhu Moosewala)याच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याच स्पष्ट झाले आहे. मुसेवाला याची हत्या लॉरेन्स याच्याच सांगण्यावरुन झाल्याचे विशेष पोलीस आयुक्त एनजीएस धालीवाल यांनी सांगितले आहे. लॉरेन्सने जेलमधून हे हत्याकांड कसे घडवून आणले याबाबत अद्याप खुलासा झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. पण लवकरच याचा उलगडा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पुण्यातून शूटर महाकाळ याला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातून शूटर महाकाळ याला अटक

या हत्याकांडातील ५ शूटर्सची ओळख दिल्ली पोलिसांनी पटवली होती. तर आठही हल्लेखोरांची ओळख पंजाब पोलिासंनी पटवली होती. यातील चार जणांना या हत्याकांडात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच प्रकरणात पुण्यात महाकाळ याला अटक करण्यात आली आहे. सिद्धेश हीरामल कांबळे उर्फ महाकाळ याचा नीकटवर्तीय सिद्धू याच्या हत्येत सहभागी होता, अशी माहिती धालीवाल यांनी दिली आहे. महाकाळचा हा साथीदार अद्याप फरार आहे. त्याचा महाराष्ट्रात आणि देशात शोध घेण्यात येतो आहे.

महाकाळला पंजाबात नेण्याची शक्यता

सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात एका शूटरला अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिासंनी दिली आहे. या हत्याकांडात सामील असलेल्या शूटरचा महाकाळ हा नीकटवर्तीय मानला जातो. ही माहिती मिळाल्यानंतर पंजाब पोलीस पुण्यात पोहचले आहेत. त्यांनी पुण्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. महाकाळ याच्या चौकशीसाठी पंजाब पोलीस त्याची कोठडी मागण्याची शक्यता आहे.