नवीन वर्षात चांगली बातमी, सिलेंडरच्या किंमतीत कपात

LPG Price 1 January 2024 | इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडर गॅसच्या दरात कपात केली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. तसेच राजस्थानमध्ये आजपासून 450 रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार आहे.

नवीन वर्षात चांगली बातमी, सिलेंडरच्या किंमतीत कपात
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 9:30 AM

नवी दिल्ली, दि. 1 जानेवारी 2024 | नवीन वर्ष 2024 हे निवडणुकीचे वर्ष आहे. या वर्षात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. यामुळे नवीन वर्षात सिलेंडर वापरकर्त्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. नवीन वर्षांत एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत घसरण (LPG Price Cut) झाली आहे. 1 जानेवारी 2024 पासून दिल्लीपासून मुंबईपर्यंत LPG Cylinder च्या दरात कपात करण्यात आली आहे. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा सिलेंडरचे दर कमी झाले आहे. यापूर्वी 22 डिसेंबर रोजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. परंतु घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे आहेत.

किती झाली दरात कपात

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडर गॅसच्या दरात कपात केली आहे. 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर एक ते दीड रुपयांनी कमी केले आहे. परंतु 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात काहीच बदल नाही. गेल्या चार महिन्यांपासून घरगुती गॅस दर जैसे थे आहे. त्यात काहीच बदल केला गेला नाही. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला होता. मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर 902.50 रुपये तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1,755.50 रुपये झाली आहे. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर 903 रुपयांमध्ये मिळत आहे. कोलकातामध्ये 929 रुपये तर मुंबईत 902.50 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर 918.50 रुपये आहे.

आजपासून राजस्थानमध्ये 450 रुपयांमध्ये सिलेंडर

भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीत 450 रुपयांत सिलेंडर देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यात 450 रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार असल्याचे जाहीर केले. BPL लाभार्थीमधील महिला आणि उज्ज्वला योजनेचे लाभार्थींना हे सिलेंडर मिळणार आहे. राजस्थान सरकार महिलांना 12 सिलेंडर स्वस्तात देणार आहे.

हे सुद्धा वाचा
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.