गौतम अदानींची आपबिती: अपहरण झालं होतं, दोन वेळा मृत्यू जवळून पाहिला…

हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण केल्यानंतर बिल भरुन बाहेर जाणार होतो. पण दहशतवादी हल्ल्याची बातमी मिळाली आणि त्यानंतर संपूर्ण रात्र दहशतीत घालवली. रात्रभर ताज हॉटेलमध्ये अडकलो होतो.

गौतम अदानींची आपबिती: अपहरण झालं होतं, दोन वेळा मृत्यू जवळून पाहिला...
गौतम अदानी यांचा बोलबाला, बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; 'या' उद्योगपतीला टाकले मागे!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 11:47 AM

नवी दिल्ली : अदानी उद्योग समूहाचे चेअरमन व देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या जीवनातील न उलगडलेले सत्य बाहेर आले. जीवनात त्यांच्यांवर आलेल्या कठीण प्रसंगांचा उल्लेख त्यांनी प्रथमच एका मुलाखतीत केला. नव्वदच्या दशकात गौतम अदानी यांचं अपहरण झालं होते. याशिवाय २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी ते ताज हॉटेलमध्येही अडकले होते. म्हणजेच दोन वेळा मृत्यू त्यांनी जवळून पहिला. यासंदर्भात एका मुलाखतीत त्यांनी या जुन्या गोष्टींना उजाळा दिला.

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani)यांनी मुलाखतीत सांगितले की, आपण आयुष्यात दोनदा मृत्यू जवळून पाहिलाय. १९९७ मध्ये त्यांचे अपहरण झाले होते. अपहरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझी सुटका करण्यात आली होती. पण ज्या रात्री माझे अपहरण झाले त्या रात्री मी शांतपणे झोपलो.कारण अनेक गोष्टी आपल्या हातात नाही. त्यामुळे नको त्या गोष्टींशी आपण चिंता करू नये.त्या वाईट काळासंदर्भात सर्व काही विसरायला हवे.

हे सुद्धा वाचा

पुन्हा एकादा मृत्यूला चकवा 26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी गौतम अदानी यांनी मृत्यू जवळून पाहिला. त्यावेळी अदानी ताज हॉटेलमध्ये होते. दुबई येथील एका मित्रासोबत जेवणासाठी ते हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवादी गोळीबार करत होते. दहशतीचे ते दृश्य अगदी जवळून अदानी यांनी पाहिले. पण आपण घाबरलो नाही, कारण घाबरून काहीही होणार नव्हते, असे अदानी यांनी स्पष्ट केलं.

दहशतवादी हल्ल्याच्या घटनेसंदर्भात बोलताना अदानी म्हणाले की, हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण केल्यानंतर बिल भरुन बाहेर जाणार होतो. पण दहशतवादी हल्ल्याची बातमी मिळाली आणि त्यानंतर संपूर्ण रात्र दहशतीत घालवली. रात्रभर ताज हॉटेलमध्ये अडकलो होतो. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी वरच्या मजल्यावर मागचा रस्ता धरला. सकाळी ७ नंतर कमांडोंच्या संरक्षणात हॉटेलमधून मला बाहेर काढण्यात आले.

मेहनतीशिवाय पर्याय नाही

मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येकाने मेहनत करून पुढे जावे. देशातील 22 राज्यांमध्ये आपले प्रकल्प सुरू असल्याचे अदानी यांनी सांगितले. यावेळी राहुल गांधी विकासाच्या विरोधात नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. राजस्थानमधील आपल्या प्रकल्पाचे राहुल गांधींनी कौतूक केल्याचे सांगितले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.