LIVE सुसाइड करत होता युवक, अमेरिकेत गेला मेसेज, 13 मिनिटांत पोलीस पोहचली, वाचले प्राण

पोलिसांना अलर्ट पाठवल्यापासून घटनास्थळावर पोहचण्यास केवळ 13 मिनिटे लागली. पोलिसांनी त्या तरुणाचे सुमारे 6 तास समुपदेशन केले.

LIVE सुसाइड करत होता युवक, अमेरिकेत गेला मेसेज, 13 मिनिटांत पोलीस पोहचली, वाचले प्राण
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 6:02 PM

गाझियाबाद : फेसबुकच्या अलर्टमुळे  उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका तरुणाचा जीव वाचला. इंस्टाग्रामवर हा तरुण लाईव्हवर आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. त्याचे अलर्ट कॅलिफोर्नियातील फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटा मुख्यालयात गेला. त्यांनी उत्तर प्रदेशातील पोलिसांना हा अलर्ट पाठवला. पोलिसांनी मोबाइल लोकेशन ट्रॅक करून तरुणाला वाचवले. या संपूर्ण प्रकरणातील विशेष बाब म्हणजे पोलिसांना अलर्ट पाठवल्यापासून घटनास्थळावर पोहचण्यास केवळ 13 मिनिटे लागली. पोलिसांनी त्या तरुणाचे सुमारे 6 तास समुपदेशन केले.

फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येशी संबंधित पोस्ट दिसल्यास तत्काळ पोलिसांना सतर्क करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये मेटा कंपनीशी करार केला होता. त्यानुसार हा अलर्ट उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाला.

मंगळवारी रात्री ९.५७ वाजता अभय शुक्ला याने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येऊन आत्महत्या करण्यास सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ पाहूनअमेरिकेतील इन्स्टाग्राम-फेसबुकच्या मुख्यालयाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सोशल मीडिया सेंटरला ईमेल अलर्ट पाठवला. या ईमेलमध्ये अभयचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकही दिला होता.

पोलिसांना त्याचे लोकेशन गाझियाबाद असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने ही माहिती गाझियाबाद पोलिस आयुक्तालयाकडे पाठवली. तेथून विजयनगर पोलिस ठाण्यात संदेश देण्यात आला. यानंतर पोलिसांनी अभयला फाशी घेण्यापुर्वीच वाचवले. अमेरिकेतून गाझियाबादला संदेश पाठवल्यानंतर पोलिस त्याच्यापर्यंत केवळ 13 मिनिटांत पोहचले.

का करत होता आत्महत्या

अभय शुक्ला (23) हा कन्नौजचा रहिवासी आहे. सध्या तो गाझियाबादमध्ये राहतो. तो गुरुग्रामच्या कॅशिफाय कंपनीत काम करत होता. ही कंपनी जुन्या मोबाइल खरेदीचा व्यवहार करते. अभय डीलर्सकडून जुने फोन घेऊन कंपनीला देत होता. अभयला प्रत्येक मोबाईलवर 20% कमिशन मिळायचे.

अभयने ही नोकरी सोडली. त्यानंतर हे काम खासगीपणे करायला सुरुवात केली. मात्र त्यात तोटा झाला. त्याने आईकडून 90 हजार रुपये घेतले. आईने ही रक्कम अभयच्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवली होती. ही रक्कमही बुडाल्याने अभय निराश झाला आणि आत्महत्या करण्यापर्यंत पोहोचला. पोलिसांनी त्याचे 6 तास समुपदेशन केले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.