Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या, प्रवीण तोगडिया यांची मागणी

| Updated on: Dec 06, 2021 | 3:42 PM

शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार द्यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया (Praveen Togadia) यांनी केली आहे.

Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या, प्रवीण तोगडिया यांची मागणी
बाळासाहेब ठाकरे
Follow us on

दिल्लीः शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया (Praveen Togadia) यांनी केली आहे. तोगडिया यांनी यापूर्वीही ही मागणी केली होती. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिवसैनिक सहभागी

ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली. यात हजारो भाजप आणि हिंदुत्त्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते सहभागी झाले. शिवसेनेचेही अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत 16 व्या शतकात बांधण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यानंतर देशभर दंगली उसळल्या. त्यात जवळपास दोन हजार लोक मारले गेले. हा इतिहास सर्वांना माहितच आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केले असेल, तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

यापूर्वीही केली होती मागणी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्वादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी उघड भूमिका घेतली होती. राम मंदिर आंदोलनाला त्यांनी नेतृत्व केल्याचे यापूर्वीही तोगडिया यांनी म्हटले आहे. राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणाऱ्या आणि त्याचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी यापूर्वी तोगडिया यांनी केली होती.

संघ परिवाराशी बिनसले

प्रवीण तोगडिया हे विश्व हिंदू परिषदेचे नेते होते. मात्र, त्यांचे संघ परिवारातील काही नेत्यांसोबत मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांची विश्व हिंदू परिषदेतून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली आहे. आता ते संधी मिळेल तेव्हा भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात.

भाजपवर कुरघोडी

सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये महाराष्ट्रात चांगलेच आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. दोघांमधील युती तुटून पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यामुळे तोगडिया यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी करून भाजपवर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

इतर बातम्याः

Raj Thackeray | राज ठाकरेंचा नाशिक दौरा पुढे ढकलला; महाराष्ट्र दौऱ्याचा नारळ पुण्यातून फुटणार, 15 डिसेंबरला MNS चा मेळावा

Sharad Pawar| एवढा भारी उपाध्यक्ष झाला नाही, पवारांकडून झिरवळांचे कौतुक; सत्ता येते-जाते, फक्त सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन