पुद्दुचेरीत शिवसेनेच्या भूमिकेत एनआर काँग्रेस, भाजपा चेकमेट?

पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या भाजपच्या प्रयत्नावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (give chief ministership otherwise we will contest elections independently says N Rangasamy )

पुद्दुचेरीत शिवसेनेच्या भूमिकेत एनआर काँग्रेस, भाजपा चेकमेट?
एन. रंगास्वामी, माजी मुख्यमंत्री पुद्दुचेरी
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 8:04 AM

पुद्दुचेरी: पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या भाजपच्या प्रयत्नावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एनआर काँग्रेसचे प्रमुख एन. रंगास्वामी यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्रीपद द्या, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू असं रंगास्वामी यांनी म्हटलं आहे. एनआर काँग्रेस थेट शिवसेनेच्याच भूमिकेत आल्याने भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे. (give chief ministership otherwise we will contest elections independently says N Rangasamy )

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा करून भाजपशी फारकत घेतली होती. भाजपने निवडणुकीत मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलं होतं, असं शिवसेनेने म्हटलं होतं. तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं नसल्याचं भाजपने म्हटलं होतं. याच गोष्टीचा फायदा घेत बिहारमध्ये नितीश कुमार यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रीपद जेडीयूकडेच राहणार असल्याचं भाजपकडून वदवून घेतलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आता एनआर काँग्रेसनेही मुख्यमंत्रीपदावर दावा केला असून भाजपकडून एनआर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं जाईल याचं आश्वासन घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून एनआर काँग्रेसने थेट आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी देऊन भाजपची कोंडी केली आहे.

काय आहे पुद्दुचेरीतील स्थिती

पुद्दुचेरी विधानसभेच्या एकूण 30 जागा आहे. पुद्दुचेरीत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पुद्दुचेरी विधानसभेत एनआर काँग्रेसने मागच्यावेळी एआयएडीएमकेसोबत युती केली होती. यावेळी एनआर काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या. तर एआयएडीएमकेला 5 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे एआयएडीएमकेसोबत मिळून एनआर काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. रंगासामी हे मुख्यमंत्री झाले होते. 2001 ते 2008पर्यंत रंगासामी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.

मुख्यमंत्रीपदाची मागणी का?

राज्यात एनआर काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. एनआर काँग्रेसची राज्यावर पकड मजबूत आहे. त्यामुळे आघाडी किंवा युती करताना मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राहावं असा रंगास्वामी यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच त्यांनी युतीच्या चर्चेची दरवाजे उघडे ठेवतानाच मुख्यमंत्रीपद एनआर काँग्रेसलाच देण्याची मागणी केली आहे. राज्यात भाजपला गेल्या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नव्हती. त्यामुळे भाजपसोबत युती केल्यास या युतीचा भाजपलाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा होऊ नये म्हणून रंगास्वामी यांनी आतापासूनच मुख्यमंत्रीपदाची सेटिंग लावण्यास सुरुवात केल्याचं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं.

अमित शहा संपर्कात

दरम्यान, रंगास्वामी यांच्याशी भाजपलाही युती करायची आहे. त्यामुळे भाजप नेते अमित शहा हे रंगास्वामी यांच्या संपर्कात आहे. रंगास्वामी यांनी काँग्रेससोबत घरोबा करू नये म्हणून शहा यांनीही प्रयत्न सुरू केला असून या दोन्ही नेत्यांची लवकरच भेट होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

युतीवर भाष्य करण्यास नकार

दरम्यान, रंगास्वामी यांनी भाजपशी युती करण्याच्या चर्चांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. मी पक्षातील सर्व आमदारांशी चर्चा करणार आहे. त्यानंतरच भाजपसोबत युती करायची की नाही याचा निर्णय घेणार आहे, असं सांगून रंगास्वामी यांनी सर्वांनाच बुचकाळ्यात पाडलं आहे. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठीच रंगास्वामी यांनी भाजपवर दबाव तंत्राचा वापर सुरू केल्याचंही बोललं जात आहे.

कोण आहेत रंगास्वामी?

रंगास्वामी हे पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री आहेत. 4 ऑगस्ट 1950 रोजी त्यांचा जन्म झाला होता. दक्षिण भारतातील वन्नियार समुदायाचे ते नेते आहेत. सरकारी विद्यालयातून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं आहे. कोणत्याही सुरक्षेशिवाय आपल्या मतदारसंघात फिरणारे ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत. कोणत्याही परवानगी शिवाय राज्यातील कोणताही नागरिक कधीही रंगास्वामी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना भेटू शकतो, असं म्हटलं जात. (give chief ministership otherwise we will contest elections independently says N Rangasamy )

रंगास्वामींचा राजकीय प्रवास

के. कामराज यांच्या कामावर प्रभावित होऊन रंगास्वामी हे विद्यार्थी दशेपासूनच राजकारणाकडे आकर्षित झाले होते. त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच जनतेच्या हिताची कामे सुरू केली होती. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पहिल्यांदा 1990मध्ये थत्तनचावडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, पहिल्याच प्रयत्नात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. परंतु, नंतरच्या विधानसभा निडवणुकीत विजयी झाल्यानंतर थेट राज्याचे कृषी आणि सहकार मंत्री झाले. त्यानंतर 1996मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2001मध्ये पुन्हा एकदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. 2006च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ 500 मते मिळाली होती. 2008मध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे त्यांनी राजकारणाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे व्ही. वैथिलिंगम हे मुख्यमंत्री झाले. मात्र, 7 फेब्रुवारी 2011 रोजी रंगास्वामी यांनी ऑल इंडिया एनआर काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात झालेल्या निवडणुकीत 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवून रंगास्वामी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. (give chief ministership otherwise we will contest elections independently says N Rangasamy )

संबंधित बातम्या:

पश्चिम बंगाल विधानसभेच्या उमेदवारांबाबत भाजपचं मंथन सुरु, ममता बॅनर्जींविरोधात भाजपकडून कोणता चेहरा?

केरळमध्ये सत्ता आल्यास पेट्रोल 60 रुपये लिटर, भाजप नेत्याचं आश्वासन

‘मिशन केरळ’साठी भाजपची मोठी खेळी; मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी

(give chief ministership otherwise we will contest elections independently says N Rangasamy )

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....