अयोध्येवर जगाची नजर, परदेशातून आली चांगली बातमी, पाहा काय होणार

राम मंदिरात भव्य कार्यक्रमात रामलल्ला विराजमान झाले आहेत. त्यामुळे अयोध्येचे महत्व प्रचंड वाढणार आहे. अयोध्येतील जागेचे भाव आधीच वाढले आहेत. जेफरीज या संस्थेने अयोध्येतील आर्थिक उलाढालीबाबत महत्वाची गोष्ट सांगितली आहे.

अयोध्येवर जगाची नजर, परदेशातून आली चांगली बातमी, पाहा काय होणार
ram temple ayodhyaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 5:18 PM

अयोध्या | 22 जानेवारी 2024 : अयोध्यानगरीत भव्य दिव्य श्री राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या थाटात संपन्न झाली आहे. देशातच नव्हे तर जगभरात या सोहळ्याच्या आयोजनाचे डोळे दीपविणारे लाईव्ह दर्शन झाले आहे. अयोध्येचा मेकओव्हर करण्यासाठी केंद्र सरकारने 85,000 कोटी रुपयांची तजवीज केली आहे. त्यामुळे त्याचा आता लाभ उत्तर प्रदेश सरकारसह देशाला मिळणार आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीज या संस्थेने राम मंदिराच्या पर्यटन क्षमतेबाबत एक अहवाल जारी केला आहे.

अयोध्येतील विकासकामांमुळे पर्यटकांना तेथे चांगल्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे दरवर्षी येथे पाच कोटींहून अधिक पर्यटक भेट देतील असा अहवाल जेफरीज संस्थेने दिला आहे. ब्रोकरेजच्या मते अयोध्या राम मंदिराने मोठा आर्थिक प्रभाव निर्माण होणार आहे. अयोध्येसाठी अनेक एअरलाईन्स कंपन्यांनी आपल्या विमान फेऱ्या सुरु केल्या आहेत. सेवा क्षेत्रातील कंपनी टाटाच्या इंडीयन होटेल्स लिमिटेड सह अनेक कंपन्यांनी आपले प्रकल्प येथे सुरु केले आहेत. त्यामुळे अनेक पंचतारांकित हॉटेल सुरु होणार आहेत.

85000 कोटी रुपयांत काय बदल ?

अयोध्येच्या राम मंदिरात भगवान श्री रामाच्या पाच वर्षांच्या बाल रुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा संपन्न झाला. जेफरीजच्या विश्लेषकांनी राम मंदिरामुळे मोठ्या आर्थिक परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे. भारताला एक नवीन पर्यटन स्थळ मिळणार आहे. येथे दरवर्षी पाच कोटी भाविक आणि पर्यटक भेट देणार आहेत. 85,000 कोटी रुपयांत अयोध्येचा मेकओव्हर झाला आहे. त्यात नवीन विमानतळ, अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास, टाऊन शिप, रस्त्यांचे व्यापक जाळे, या प्रस्तावित पंचतारांकित हॉटेल्स आणि अन्य फायनान्सियल एक्टीव्हीटीजमुळे येथे आर्थिक सुबत्ता वाढणार आहे.

दर दिवशी 1 ते 1.5 लाख भाविक पोहचणार

सुमारे 70 एकर परिसरात पसरलेल्या मुख्य तीर्थस्थळ आणि 10 लाख भक्तांची एकावेळी व्यवस्था होईल अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे येथे दर दिवशी एक ते दीड लाख पर्यटक आणि भाविक पोहचण्याची शक्यता असल्याचे जेफरीजच्या अहवालात म्हटले आहे. भारताच्या पर्यटनात धार्मिक पर्यटनाचा वाटा सर्वाधिक आहे. देशातील अनेक धार्मिक पर्यटन स्थळी पायाभूत सुविधांची वाणवा असूनही 3 कोटी पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. तर अयोध्येची निर्मिती चांगली कनेक्टीविटी आणि इंन्फ्रास्ट्रक्चरने सुसज्ज अशी आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

जीडीपीत पर्यटनाने 443 अब्ज डॉलरची भर

अयोध्येतील राम मंदिर 1800 कोटी रुपयांत तयार करण्यात आले आहे. या मंदिराला आध्यात्मिक आणि पर्यटन केंद्रात रुपांतर केले आहे.राम मंदिरामुळे हॉटेल, एअरलाईन्स, हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी, ट्रॅव्हल एडव्हायजर, सिमेंट सह अनेक क्षेत्राला फायदा होणार आहे. आर्थिक वर्षे 2019 मध्ये ( कोविड पूर्व ) जीडीपीत पर्यटनाने 194 अब्ज डॉलरचे योगदान दिले आहे. आर्थिक वर्ष 2033 पर्यंत 8 टक्के सीजीआरने (CGR) वाढून हे योगदान  443 अब्ज डॉलर होण्याची आशा आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.