गोव्याचे मुख्यंत्री प्रमोद सावंत अचानक दिल्लीत?; कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. गोवा कला अकादमीच्या पुनर्विकासानंतर त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या आरोपावरून विरोधकांनी संपूर्ण राजकारणच ढवळून काढलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत चोहोबाजूने घेरलेले असतानाच मुख्यमंत्र्यांना अचानक दिल्लीत जावं लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गोव्याचे मुख्यंत्री प्रमोद सावंत अचानक दिल्लीत?; कारण काय?
pramod sawantImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 9:24 PM

नवी दिल्ली | 2 फेब्रुवारी 2024 : गेल्या काही दिवसांपासून गोवा सरकार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. गोव्यातील भ्रष्टाचारावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गोव्यातील भ्रष्टाचार अडचणीचा ठरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे गोव्यातील कथित भ्रष्टाचारांच्या आरोपांची भाजप नेतृत्वाने दखल घेतल्याचं सांगितलं जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज अचानक दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे गोव्यात काही तरी वेगळं घडतंय अशा चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज अचानक दिल्लीला गेल्याची सूत्रांची माहिती आहे. सावंत दिल्लीत गेल्याने गोव्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. पार्टीतील अंतर्गत संघर्ष, कथित भ्रष्टाचाराचे आरोप, सांस्कृतिक मंत्री गोविंद गौडे यांच्यावर झालेले आरोप आणि विरोधकांनी सरकारला आणलेले नाकीनऊ यामुळे सावंत यांना दिल्लीत जावं लागल्याचं सांगितलं जात आहे.

अन् आर्थिक अनियमितता उघड झाली

गोव्यातील राजकीय वातावरण तापण्याला गोव्याचे स्पीकर रमेश तवाडकर हे कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा अध्यक्ष तवाडकर यांनीच राज्याचे मंत्री गौडे यांच्यावर कोरोडो रुपयांचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी 26.85 लाख रुपये खर्च करण्यात आले. एवढा पैसा कसा खर्च झाला याची मागणी करण्यात आली आहे. गोवा कला अकादमीच्या पुनर्विकासावेळी आर्थिक अनियमितता समोर आली. त्यानंतर या चौकशीच्या मागणीने अधिकच जोर धरला आहे. गौडे यांच्या विरोधात नुकतीच निदर्शनेही करण्यात आली होती. त्याच्याशीही मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याची लिंक लावली जात आहे.

गुप्त बैठकीत काय ठरलं?

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत आणि तवाडकर यांच्या एक गुप्त मिटिंग झाल्याचीही चर्चा आहे. या बैठकीत गौडे यांना मंत्रीपदावरून हटवण्याचा निर्णय झाल्याचंही सांगितलं जात आहे. या कथित घोटाळ्यातून अलिप्त राहण्यासाठीच गौडे यांचा बळी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव असल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. याच विभागाने ही सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच्या निधीला मंजुरी दिली होती. तरीही गौडे यांना हटवण्याच्या हालचाली सुरू आहेत. कला अकादमीच्या विकासासाठी अर्थ खात्यानेच निधी दिला आहे. असं असताना गौडे यांनाच दोषी धरणं कितपत योग्य आहे? असा सवालही केला जात आहे.

तीच खेळी पुन्हा….?

अलिकडेच आमदार निलेश कॅब्राल यांची सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांची ज्या पद्धतीने हकालपट्टी झाली होती, तशीच खेळी आता गौडे यांच्याबाबत खेळली जात असल्याचंही सांगितलं जात आहे. कॅब्राल यांना मंत्रिमंडळातून काढण्यापूर्वी त्यांचीही चौकशी करण्यात आली होती. हाच पॅटर्न आता पुन्हा वापरला जात आहे. बळीचा बकरा देऊन मुख्यमंत्री स्वत:चा बचाव करत असल्याचा विरोधक आरोप करत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर सावंत यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलं आहे. दिल्लीतून आल्यावर सावंत कोणती खेळी करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, सावंत दिल्लीला जाण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. राज्यातील घडामोडींबाबत पक्षनेतृत्वाला माहिती देऊन नेतृत्वाकडून सावंत हे मदतीचा हात मागू शकण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या माहितीशिवाय…

भाजपमधील या अंतर्गत वादावर विरोधकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गोविंद गौडे यांचा राजीनामा घेण्यात यावा. तसेच सरकारवर झालेल्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा, अशी मागणी गोव्यातील आपचे प्रमुख अमित पालेकर यांनी केली आहे. पालेकर यांनी मुख्यमंत्र्यांवरच भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप करत जोरदार टीकाही केली आहे. कला अकादमीत काय झालं हे आम्ही पाहिलं आहे. कला अकादमीच्या विकास कामात घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्र्यांना माहीत असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, असा माझा समज आहे. त्यामुळे आता सरकारने तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी आणि आपलं कर्तव्य पार पाडावं, अशी मागणी अमित पालेकर यांनी केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.