भाजप मंत्र्याला ‘ते’ प्रकरण भोवणार? गोव्याचे नगरविकास मंत्री मिलिंद नाईकांचा राजीनामा
एका महिलेशी संबंधित प्रकरणावरुन करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे अखेर मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनीही स्वीकारल्याचं कळतंय. गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मिलिंद नाईक यांच्या नावाचा गौप्यस्फोट केल्यानंतर मिलिंद नाईक यांनी त्तत्काळ मंत्रिपद सोडलंय.
मुंबई : गोव्यातील सत्ताधारी भाजप सरकारमधील (BJP Government) नगरविकासमंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी राजीनामा दिल्याचं खात्रीलायक वृत्त हाती येतंय. एका महिलेशी संबंधित प्रकरणावरुन करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे अखेर मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्याचा राजीनामा मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वीकारल्याचं कळतंय. गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी मिलिंद नाईक यांच्या नावाचा गौप्यस्फोट केल्यानंतर मिलिंद नाईक यांनी त्तत्काळ मंत्रिपद सोडलंय.
सेक्स स्कँडलमध्ये गोवा मंत्रिमंडळातील मंत्री मिलिंद नाईक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडून उघड करण्यात आलं होतं. कथित आरोपाचा व्हिडिओ वा ऑडिओ नाही. मात्र त्यांनी महिलेवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविला होता. दिलेल्या मुदतीत सरकार कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने हे नाव उघड केल्याचे चोडणकरांनी सांगितले म्हटलं होतं.
Milind Naik has tendered his resignation as Minister in Government of Goa, to ensure a free and fair probe, which has been accepted and sent to the Governor: Chief Minister’s Office
Goa Congress President today accused Naik of being involved in a “sex scandal”.
— ANI (@ANI) December 15, 2021
गिरीश चोडणकरांच्या आरोपानं खळबळ
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने एका महिलेवर अत्याचार केल्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. तत्पूर्वी गिरीश यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन त्या मंत्र्याचे नाव राज्यपालांना सांगितले आहे.
स्वत: व्हिडीओ पाहिला – चोडणकर
मुरगावचे भाजप आमदार मिलिंद नाईक हे बिहारमधील एका महिलेचे लैंगिक शोषण झालेल्या कथित सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितलंय की, नाईक यांचा सहभाग सिद्ध करणारा व्हिडिओ त्यांनी स्वतः पाहिला होता. दोन दिवसांपूर्वी चोडणकर यांनी राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली होती. तसेच या स्कँडलमधील त्यांच्या कथित सहभागामुळे नाईक यांना भाजपच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, अशी मागणी केली होती.
इतर बातम्या :