Gold rate : या शहरात मिळते सर्वात स्वस्त सोनं, भारतात कोणत्या शहरात किती आहे दर
भारतात सोन्याचे दर वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे असतात. गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढल्याने सोन्याचे दर सतत वाढत होते. पण आता सोन्याच्या दरात घट पाहायला मिळाली. भारतात कोणत्या शहरात सर्वात स्वस्त सोने मिळते जाणून घ्या.
सोन्या-चांदीच्या दरात सध्या घसरण झालीये. सोन्याचे दर झपाट्याने खाली आले आहेत. सोन्याचा सध्या भाव ( Gold Rate ) 72 ते 75 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम राहण्याची शक्यता आहे. भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याचे दर वेगवेगळे असतात. ते बदलत देखील असतात. शनिवारी भारतात 1 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर मुंबईत 5376 रुपये इतका होता. चेन्नईत सोन्याचा दर 5,447 रुपये आहे. दिल्ली, वडोदरा आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये सोने 5,380 रुपये प्रति 1 ग्रॅम इतका आहे.
शनिवारीही सोन्याचे दर घसरले
रविवारी, 9 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 65,700 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 71,670 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 53,760 रुपये आहे. शनिवारी २४ कॅरेट सोन्याचा दर २०८ रुपयांनी घसरला होता. पीपल्स बँक ऑफ चायनाने सोन्याची खरेदी थांबवल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. दुसरीकडे अमेरिकेत 2.72 लाख नवीन नोकऱ्या निर्माण झाल्यामुळे सोन्याचे दर वेगाने पुढे जात होते. पण आता त्यात घसरण झाली आहे.
चांदीच्या दरात होतेय वाढ
3 ते 7 जूनदरम्यान सोन्याच्या दरात सुमारे 2 टक्क्यांनी वाढ झालीये. 1 किलोचा दर 91,500 रुपये आहे. इलेक्ट्रिक वाहने, हायब्रीड कार आणि सौर पॅनेलमध्ये चांदीचा वापर केल्यामुळे चांदीची मागणी वाढली आणि त्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली. मे महिन्यात चांदीने सोनेच नाही तर बीएसई सेन्सेक्सलाही परताव्याच्या बाबतीत मागे टाकले आहे.
रशियाकडूनही सोने खरेदी कमी करण्याचे संकेत
जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, जगातील केंद्रीय बँकांनी एप्रिल महिन्यात जवळपास 33 मेट्रिक टन सोने खरेदी होते. पण चीननंतर रशियानेही सोन्याची खरेदी कमी करण्याचे संकेत दिले आहेत. तेव्हा सोन्याचा दर 75 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 96 हजार रुपये प्रति किलो असा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे भारतात नेहमी सोन्याची मागणी असते.