कर्मचाऱ्यांसाठी Good News, पुढच्या वर्षात कंपन्या कर्मचाऱ्यांचे इन्क्रिमेंट भरपूर करणार, जाणून घ्या कारण

सगळ्यात अधिक मागणी असणाऱ्या किंवा नोकऱ्या असणाऱ्या कंपन्यांचा विचार केल्यास, पहिल्या स्थानावर आयटी कंपन्या आहेत, त्यांची मागणी 65.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या स्थानावर इंजिनिअरिंग असणाऱ्यांना संधी आहे, त्यांच्या मागणीत 52.9 टक्के वाढीची शक्यता आहे. सेल्समध्ये 35.4 टक्के मागणी तर 32.5 टक्के टेक्निकल, स्कील ट्रेन्ड मनुष्यबळाची गरज निर्माण होणार आहे

कर्मचाऱ्यांसाठी Good News, पुढच्या वर्षात कंपन्या कर्मचाऱ्यांचे इन्क्रिमेंट भरपूर करणार, जाणून घ्या कारण
पुढल्या वर्षी चांगली पगारवाढImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 8:37 PM

नवी दिल्ली – पुढच्या वर्षी कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्के इन्क्रिमेंट देण्याची शक्यता आहे. एका अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. झालंय असं की बहुतांश कंपन्या सध्या एट्रिशेन रेटशी झुंज देत आहेत. एट्रिशेन रेट म्हणजे कर्मचाऱ्यांची घटती संख्या, ही समस्या सध्या सर्व कंपन्यांना भेडसावते आहे. ट्रेनी किंना नवे कर्मचारी कंपनी जॉईन करतात, मात्र त्यानंतर लगेचच ते दुसऱ्या एखाद्या कंपनीत जात आहेत. त्यामुळे कंपन्यांच्या परफॉर्मन्सवर या सगळ्याचा चांगलाच परिणाम होतो आहे. हा एट्रिशेन रेट रोखण्यासाठी, कर्मचाऱ्यांना लुभावणे गरजेचे आहे. त्याचसाठी 2023 साली सगळ्याच कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारांत 10 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. विलिर्स टॉवर्स वॉटसनच्या सॅलरी बजेट प्लँनिंग रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील कंपन्याही 10 टक्के पगारवाढीच्या दृष्टीनेच या वर्षीच्या बजेटवर काम करीत आहेत.

गेल्या वर्षीपेक्षा जास्त होणार पगारवाढ

जर खरंच पुढच्या वर्षी कर्मचाऱ्यांना 10 टक्के इन्क्रिमेंट मिळाले तर ते गेल्यावर्षीपेक्षा 0.5 टक्क्यांनी जास्त असेल. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांचे पगार साधारणपणे 9.5 टक्क्यांनी वाढले होते. या अहवालानुसार भारतातील सुमारे 58 टक्के कंपन्या या पगार वाढवण्याच्या बजेवर काम करीत आहेत. देशातील 24.4 टक्के कंपन्या अशा आहेत की ज्या पगारवाढीबाबत कोणताही विचार करीत नाहीत. तर देशातील 5.4 टक्के कंपन्या अशा आहेत की ज्यांनी 2021-22 ज्या तुलनेत यावर्षीच्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे.

काय आहे रिपोर्टमध्ये

पगाराशी संबंधित या रिपोर्टमध्ये, पुढच्या वर्षी 2023 साली भारतातील कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्के वाढ करु शकतात. असे झाले तर पूर्ण आशिया प्रशांत क्षेत्रात ही वाढ सर्वाधिक असेल. भारतात पुढच्या वर्षी 10 टक्के पगारवाढीची शक्यता आहे. तर चीनमध्ये 6 टक्के, सिंगापूरमध्ये 4 टक्के, हाँगकाँगमध्ये 4 टक्के वाढण्याची शक्यता आहे. 42 टक्के कंपन्यांनी पुढच्या वर्षात कंपन्या चांगला व्यवसाय करीत असा अंदाज व्यक्त केलेला आहे. म्हणजेच या कंपन्यांच्या नफ्यात वाढ होणे अपेक्षित आहे. 7.2 टक्के कंपन्यांना तोटा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

कोणकोणत्या क्षेत्रांना सर्वाधिक मागणी

सगळ्यात अधिक मागणी असणाऱ्या किंवा नोकऱ्या असणाऱ्या कंपन्यांचा विचार केल्यास, पहिल्या स्थानावर आयटी कंपन्या आहेत, त्यांची मागणी 65.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या स्थानावर इंजिनिअरिंग असणाऱ्यांना संधी आहे, त्यांच्या मागणीत 52.9 टक्के वाढीची शक्यता आहे. सेल्समध्ये 35.4 टक्के मागणी तर 32.5 टक्के टेक्निकल, स्कील ट्रेन्ड मनुष्यबळाची गरज निर्माण होणार आहे. या सगळया क्षेत्रात पुढील काळात अधिक नोकऱ्यांची संधी असेल.

सध्या नोकरी सोडण्याच्या प्रमाणात वाढ

पूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्रात भारतात सर्वाधिक व्हॉलेंटरी एट्रिशन रेट आहे. याचा अर्थ अनेक जणं हे स्वताच्या इच्छेने कंपन्यांच्या नोकऱ्या सोडत आहेत. भारतात हा सर 15.1 टक्के इतके आहे. दुसऱ्या क्रमांकावर हाँगकाँग आहे. गेल्या वर्षीही हा धोका लक्षात घेऊन कंपन्यांनी चांगली पगारवाढ केली होती. असे केल्याने एट्रिशन रेट कमी होईल आणि कंपन्यांचा परफॉर्मन्स चांगला वाडू शकेल, असा विचार आहे. पुढच्या वर्षी कंपन्यांचा परफॉर्मन्स चांगला राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत कंपन्याही आपली पावले काळजीपूर्वक उचलत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.