Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणाला हजार, कोणाला 80 हजार, Google Pay अकाउंटमध्ये धनवर्षाव

गुगल पे वापणाऱ्या काही ग्राहकांना अचानक धनवर्षाव झाला आहे. काही जणांच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली. काही ग्राहकांच्या बँक खात्यात 10 ते 1000 अमेरिकन डॉलर्स जमा केली गेली होती. ही बातमी चांगलीच व्हायरल झाली होती. पण...

कोणाला हजार, कोणाला 80 हजार, Google Pay अकाउंटमध्ये धनवर्षाव
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 11:52 AM

नवी दिल्ली : दुकानातील छोट्या मोठ्या खरेदीसाठी आपण व्हॅलेटचा वापर करत असतो. मग या व्हॅलेटमधून कॅशबॅकही मिळत असते. आपल्यापैकी अनेक जणांकडे Google Pay असेल. त्यातून तुम्हाला चांगले रिवॉर्ड मिळाले असतील. कॅशबॅकसह खरेदीवर घसघसीत सुटीचा फायदा घेतला असेल. पण अचानक तुमच्या खात्यात हजारो रुपये जमा झाले तर किती आनंद होईल. गुगल पे ने असेच काही केले. काही जणांच्या खात्यात 80,000 रुपये जमा केले. मग Google Pay वापरणाऱ्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी लागलीच आपला आनंद मित्रांना शेअर केला. तुझ्या खात्यातही पैसे आले का? विचारणा केली.

पुढे असे झाले

गुगल पेमुळे खात्यात मोठी रक्कम जमा झाली. काही ग्राहकांच्या बँक खात्यात 10 ते 1000 अमेरिकन डॉलर्स जमा करण्यात आले होते. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. काही वेळातच कंपनीने पैसे परत घेण्यास सुरुवात केली. ही चूक कंपनीला समजताच त्यांनी ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. काही वेळातच पैसे काढण्यात आले.

हे सुद्धा वाचा

पत्रकाराने केले ट्विट

मिशाल रहमान या परदेशी पत्रकाराने ट्विटरवर लिहिले, “Google Pay सध्या आपल्या वापरकर्त्यांना मोफत पैसे देत आहे असे दिसते. मी नुकतेच Google Pay उघडले आणि मला असे आढळले की मला $46 डॉलर मिळाले. Google Pay उघडा आणि Deals टॅबवर स्वाइप करा. तुम्हाला कोणतेही रिवॉर्ड मिळाले आहेत की नाही हे तुम्ही तपासू शकता. मला वाटते ही चूक झाली आहे. मला काही गुगल युजरचा मेसेज आले. त्यांच्या खात्यात US$1072 जमा झाले. तर, दुसऱ्याला $240 मिळाल्याचे सांगितले.

दरम्यान गुगल पे मध्ये मिळालेली रक्कम अनेकांनी खर्चही करुन टाकली. आता ही रक्कम परत करण्याची मागणी कंपनी करत आहे.

कंपनीने चूक सुधारली

गुगल पे ला चूक लक्षात येताच दिलेली रक्कम परत काढण्यास सुरुवात केली. या चुकीसाठी कंपनीने मेलही पाठवला आहे. कंपनीने लिहिले, “तुम्हाला हा ईमेल मिळाला आहे कारण तुमच्या Google Pay खात्यात रोख रक्कम जमा झाली आहे. अनेक खात्यांमधून शुल्क परत काढण्यात आले आहे कारण हे चुकून घडले आहे. ज्यांनी हे पैसे खर्च केले आहेत त्यांना पैसे परत केले पाहिजेत.

तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील.
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत.
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली.
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले.
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक.
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.