लेकीच्या लग्नात आईच झाली नवरी, आधी कन्यादान नंतर सात जन्माची गाठ!
मंडळी, आता एकाच मांडवात बहिणींची आणि भावंडांची लग्न झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे पण एकाच मांडवात लेकीचं आणि आईचं लग्न झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे का?
गोरखपूर : लग्न म्हटलं की आनंदाचा क्षण असतो. नवरा-बायकोच्या सुंदर नात्यामुळे दोन कुटुंब एकत्र येतात. आयुष्याची नवी सुरुवात असते. पण लग्नात अनेक विचित्र आणि गमंतीच्या घटना घडल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये समोर आला आहे. मंडळी, आता एकाच मांडवात बहिणींची आणि भावंडांची लग्न झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे पण एकाच मांडवात लेकीचं आणि आईचं लग्न झाल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? नसेल तर असा प्रकार खरंच समोर आला आहे. (gorakhpur news mother and daughter marry together in uttar pradesh)
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेंतर्गत एकाच मंडपात 50 हून अधिक विवाहसोहळा पार पडला. पण यामध्ये एकाच लग्नाची चर्चा सुरू आहे. या अनोख्या लग्नाच्या मंडपात आई आणि मुलीनेही साप्तपदी घेतल्या. सोहळ्यात आई बेला देवीने आधी लेकीचं कन्यादान केलं आणि यानंतर स्वत:च लग्नाचा पोशाख घातला आणि त्याच मंडपात आपल्या जोडीदाराच मेव्हण्यासह लग्न केलं.
गोरखपुरात मुख्यमंत्री गट विवाह योजनेंतर्गत 63 जोडप्यांनी एकत्र लग्न केलं. या लग्न सोहळ्यात आई आणि मुलीने सगळ्यांचं मन जिंकलं. आईनेही आपल्या प्रेमाची साथ देत वयाचा विचार न करता विवाह केल्याने सर्वच स्तरातून त्यांचं कौतूक होत आहे. या आश्चर्याच्या घटनेची चर्चा सध्या संपूर्ण शहरात सुरू आहे.
खरंतर, मुलीच्या लग्नानंतर बेला देवीला एकटं राहणं सोपं नव्हतं. बेला आणि तिचा जोडीदार जगदीश यांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी मुलं आणि कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. आई आणि मुलीच्या या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे.
बेला 25 वर्षांपूर्वी झाली होती विधवा
बेला देवी यांच्या पतीचे 25 वर्षांपूर्वी निधन झाले. पहिल्या पतीपासून बेलाला दोन मुले आणि तीन मुली आहेत. 25 वर्षांपासून एकट्या राहणाऱ्या बेलाने कुटूंबाच्या सल्ल्यानंतर स्वत: च्या मेहुण्याशी लग्न केलं आहे. (gorakhpur news mother and daughter marry together in uttar pradesh)
इतर बातम्या –
अनैतिक संबंधातून सुटका करुन घेण्यासाठी मित्रानेच केली तृतीयपंथी युवकाची हत्या
सोलापूरमधून मुंबईला येणारे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त, चालकाच्या सीटमुळे संपूर्ण प्रकार उघडकीस
(gorakhpur news mother and daughter marry together in uttar pradesh)