अरे वा… सरकारी कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासरे यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार सुट्टी

सुट्ट्या 6 आणि 8 नोव्हेंबरला मिळणार आहे. त्यासोबत 7 नोव्हेंबरला छठपूजेची सुट्टी आहे. 9 नोव्हेंबरला दुसऱ्या शनिवारची सुट्टी आणि 10 नोव्हेंबरला रविवारची सुट्टी घेता येईल. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी टप्प्याटप्प्याने या सुट्ट्या घेऊ शकतात.

अरे वा... सरकारी कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासरे यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार सुट्टी
senior citizen
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 5:57 PM

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. त्यांना आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यासोबत वेळ घालण्यासाठी दोन दिवसांची विशेष सुट्टी मिळणार आहे. आसाम राज्य सरकारने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या विशेष रजा योजनेची घोषणा केली. या दोन दिवासांच्या सुट्टीत कर्मचारी आई-वडील आणि सासरच्यांसोबत वेळ घालवू शकतात. कौटुंबिक संबंध दृढ करणे आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी देणे हा या योजनेचा उद्देश आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी खूश झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

आसाम सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आई-वडील किंवा सासरच्या लोकांसोबत वेळ घालवण्यासाठी दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. ही सुट्टी नोव्हेंबरमध्ये दोन दिवस मिळणार आहे. परंतु ही विशेष रजा वैयक्तिक मनोरंजनासाठी वापरली जाऊ शकत नाही. या सुट्टीत आई-वडील किंवा सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवावा लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना आई-वडील किंवा सासरे नाहीत त्यांना ही सुट्टी मिळणार नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

सीएमओने X वर केली पोस्ट

सीएमओने X वर एका पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दोन दिवस सुट्टीचा वापर केवळ वृद्ध आई-वडील किंवा सासरांसोबत वेळ घालवण्यासाठी केला जाईल. ही सुट्टी वैयक्तिक मनोरंजनासाठी वापरता येणार नाही, जेणेकरून त्यांचा आदर केला जाईल आणि त्यामुळे जेणेकरून त्यांची काळजी घेता येईल.

कधी मिळणार ही सुट्टी

सीएमओने सांगितले की, या सुट्ट्या 6 आणि 8 नोव्हेंबरला मिळणार आहे. त्यासोबत 7 नोव्हेंबरला छठपूजेची सुट्टी आहे. 9 नोव्हेंबरला दुसऱ्या शनिवारची सुट्टी आणि 10 नोव्हेंबरला रविवारची सुट्टी घेता येईल. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी टप्प्याटप्प्याने या सुट्ट्या घेऊ शकतात. मुख्यमंत्री हिमन्त बिश्व शर्मा यांनी 2021 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर स्वातंत्र्यदिनी आपल्या पहिल्या भाषणात या विशेष सुट्ट्यांची घोषणा केली होती. आसाम सरकारने सुरु केलेला हा उपक्रम इतर राज्यात सुरु होणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.