Rahul Bajaj passes away; राहुल बजाज यांनी बजाज ब्रँडला घराघरात पोहोचविले; राज्यापालांनी वाहिली श्रद्धांजली
उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासात बजाज घराण्याचे आणि बजाज उद्योग समूहाचे योगदान फार मोठे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे आज निधन झाले, वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, बजाज समूहाच्या उभारणीमध्ये (Bajaj Group) राहूल बजाज यांचे मोठे योगदान होते. राहुल बजाज यांचा जन्म दहा जून 1938 मध्ये झाला होता. बजाज यांनी अर्थशास्त्र आणि लॉमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’ (mba) देखील पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल बजाज यांची 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. बजाज उद्योग समुहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचे योगदान मोठे आहे. गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासात बजाज घराण्याचे आणि बजाज उद्योग समूहाचे योगदान फार मोठे आहे. बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपल्या कार्यकाळात बजाज उद्योग समूहाचा देशात तसेच बाहेर मोठा विस्तार केल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे.
आधुनिक व्यवस्थापनाला तंत्राची जोड
पुढे बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले की, उद्योगाला आधुनिक व्यवस्थापन तंत्राची जोड देताना त्यांनी ‘बजाज’ हे ब्रँड नाव सर्वतोमुखी केले. देशाच्या उद्योग विश्वासमोर ज्या समस्या आल्या त्याबद्दल बजाज यांनी आपले मत परखडपणे मांडले. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात तसेच रोजगार निर्मितीत बजाज समूहाचे योगदान मोठे आहे. सामाजिक दायित्वाच्या बाबतीत देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाने आणि विशेषतः महाराष्ट्राने एक द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले आहे. मी बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करतो, व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय आणि बजाज परिवाराला कळवतो असे राज्यापालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
शरद पवार यांनीही वाहिली श्रद्धांजली
दरम्यान शरद पवार यांनी देखील राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर मला धक्का बसला. राहुल बजाज हे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू होते. बजाज उद्योग समुहाला मोठे करण्यात त्यांचे भरीव योगदा असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांचे ट्विट
I am deeply shocked to learn about the sad demise of Padma Bhushan Shri Rahul Bajaj! The grandson of eminent freedom fighter Jamnalal Bajaj brought transformation in society especially in poor and middle-class people with his two-wheel technology – a Bajaj Bike!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 12, 2022
संबंधित बातम्या
हमारा बजाज मध्यमवर्गीयांच्या घरात पोहोचवणाऱ्या राहुल बजाज यांचं निधन, 83 व्या वर्षी अखेरचा श्वास
राणेंचा लोकसभेत गडबड घोटाळा; केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर, सभापतींनी कसे निस्तारले?