नवी दिल्ली: पर्यावरणवादी दिशा रवीला टूलकिट प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मात्र, दिशा रवीला अटक केल्याने त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच आता पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गही दिशासाठी मैदानात उतरली आहे. ग्रेटाने एक ट्विट करून दिशाचं समर्थन करतानाच मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून टीकाही केली आहे. (Greta Thunberg reacts to Disha Ravi’s arrest)
स्वीडनमध्ये राहणाऱ्या ग्रेटाने फ्रायडे फॉर फ्यूचर या संस्थेच्या एका ट्विटला रिप्लाय देताना मानवाधिकाराचा मुद्दा उचलला आहे. तसेच #StandWithDishaRavi असा हॅशटॅगही तिने वापरला आहे. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी म्हणजे ऑगस्ट 2018मध्ये ग्रेटाने तिच्या संस्थेची स्थापना केली होती.
ग्रेटाने काय म्हटलंय ट्विटमध्ये
बोलण्याचं स्वातंत्र्य, शांततेत विरोध करणं आणि जनसभा आयोजित करणं मानवाधिकार आहे. या गोष्टी कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत गाभा असला पाहिजे, असं ग्रेटाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
13 फेब्रुवारी रोजी अटक
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेलं वादग्रस्त टूलकिट गुगल दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी दिशाला 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथून अटक केलं आहे.. पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी हेच टूलकिट दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केले होते. भारतात द्वेष निर्माण करण्यासाठी दिशाने खलिस्तान समर्थक ग्रुप पोएटिक जस्टिस फाऊंडेशनशी हात मिळवणी केल्याचाही आरोप दिशा रवी यांच्यावर आहे. ही टूलकिट संपादित करणाऱ्यांपैकी दिशा एक असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे. (Greta Thunberg reacts to Disha Ravi’s arrest)
आणखी दोघांवर संशय
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी तयार करण्यात आलेलं वादग्रस्त टुलकिट गुगल दस्ताऐवज सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी दिशाला अटक केलेलं आहे. त्यानंतर या प्रकरणात शंतनू मुळूक आणि निकिता जेकब यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा यापूर्वी पोलिसांनी केला आहे. या संशयितांची चौकशी करण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. (Greta Thunberg reacts to Disha Ravi’s arrest)
Freedom of speech and the right to peaceful protest and assembly are non-negotiable human rights. These must be a fundamental part of any democracy. #StandWithDishaRavi https://t.co/fhM4Cf1jf1
— Greta Thunberg (@GretaThunberg) February 19, 2021
संबंधित बातम्या:
Kim Kardashian Divorce | अमेरिकन सेलिब्रिटी किम कार्दशियनचा घटस्फोटासाठी अर्ज
कोण आहे दिशा रवी? पोलिसांकडून अटक का?; वाचा विशेष रिपोर्ट!
(Greta Thunberg reacts to Disha Ravi’s arrest)