West Bengal Suicide | सुहागरात साजरा करताच नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या, नेमकं काय घडलं ज्याने पश्चिम बंगाल हादरलं
प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. सध्या तरी वराच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. कुटुंबासोबतच नववधूही विचार करत आहे की, हनिमूनला असे काय घडले, ज्यामुळे वराने आपले जीवन संपवले.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. नवविवाहित जोडप्याने रात्री सुहागरात साजरी केल्यानंतर सकाळी नवरदेवाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हावडा येथील शालीमार परिसरात शनिवारी घडली आहे. मात्र नवरदेवाने अचानक असे का केले याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. नववधू आणि कुटुंबीयांनाही या घटनेमुळे धक्का बसला आहे.
नेमकं काय घडलं?
हावडा येथील बी गार्डन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शालीमार परिसरात मयत नवरदेव आपल्या कुटुंबासोबत राहतो. मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात त्याचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर प्रत्येक जोडप्याला ज्या क्षणाची उत्सुकता असते ती म्हणजे सुहागरात. दोघा पती-पत्नीने आपल्या सुहागरातचा आनंदही लुटला. त्यानंतर सकाळी नवरदेवाने आपल्या पत्नीला अंघोळ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे पत्नी अंघोळीसाठी गेली. जवळपास अर्ध्या तासाने पत्नी अंघोळ करुन आपल्या खोलीत आली तर पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. हे पाहून पत्नीला धक्काच बसला.
पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत
घटनेची माहिती मिळताच बी गार्डन पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. सध्या तरी वराच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. कुटुंबासोबतच नववधूही विचार करत आहे की, सुहागरातच्या रात्री असे काय घडले, ज्यामुळे वराने आपले जीवन संपवले. यावरून पोलीस कुटुंबीयांची चौकशीही करत आहेत. लवकरच या घटनेचा छडा लावला जाईल. शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सोपवण्यात येणार आहे. अनेक बाबी लक्षात घेऊन पोलीस तपास करत आहेत.
दोघांच्या संमतीने झाला होता विवाह
7 डिसेंबर रोजी शालीमार येथे राहणाऱ्या आदर्श साओ (24) याचे बराकपूर येथील एका मुलीसोबत थाटामाटात लग्न झाले होते. दोघांच्या संमतीने हे लग्न ठरल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 8 डिसेंबर रोजी वधू सासरच्या घरी पोहोचली. गुरुवारी मधुचंद्र आणि शुक्रवारी रात्री बहू-भातचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी दोघांनाही जाग आली. वराने वधूला आंघोळ करण्यास सांगितले, सुमारे अर्ध्या तासानंतर ती आंघोळ करून खोलीत आली असता तिचा नवरा फासावर लटकत असल्याचे दिसले. हे पाहून घरात एकच आरडाओरडा झाला.
वधूने सांगितले की, लग्न ठरल्यानंतर दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून संपर्कात होते आणि रोज फोनवर बोलत होते. आम्ही दोघेही लग्नाची आतुरतेने वाट पाहत होतो. सगळं व्यवस्थित चाललं होतं. शुक्रवारी सकाळी त्याने मला आंघोळीसाठी पाठवले. अर्ध्या तासानंतर मी खोलीत आले तेव्हा त्याने शालीच्या सहाय्याने फास लावून घेतला होता. (Groom suicide by hanging after marriage in west bengal)
इतर बातम्या