Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Crime: बहिणीचे लग्न मोडण्यासाठी इन्स्टाग्रामवर उघडले नवरदेवाचे बनावट अकाऊंट; गुन्ह्याचा हेतू ऐकून पोलिसही चक्रावले

चौकशीत आरोपीने सांगितले की, तक्रारदाराची होणारी पत्नी ही आरोपीच्या दूरच्या नात्याची बहीण आहे आणि तिचे लग्न मोडण्याच्या उद्देशाने तो हे सर्व करत होता. त्याच्या या कटकारस्थानाने सर्वांनाच धक्का बसला. आर्थिक फसवणुकीपाठोपाठ एकमेकांच्या दुष्मनीतून बदला घेण्यासाठीही सायबर गुन्हेगारीचा वापर होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

UP Crime: बहिणीचे लग्न मोडण्यासाठी इन्स्टाग्रामवर उघडले नवरदेवाचे बनावट अकाऊंट; गुन्ह्याचा हेतू ऐकून पोलिसही चक्रावले
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 11:53 PM

मैनपुरी : सोशल मिडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. पोलिसांच्या सायबर सेलमार्फत विशेष मोहिमा आखून गुन्हेगारांना जरब बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र गुन्हेगार त्यातूनही पळवाटा शोधून फसवणुकीचे प्रकार सुरू ठेवत आहेत. उत्तरप्रदेशच्या मैनपुरीतील अशाच सायबर ठगाने अनेकांना चक्रावून टाकल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या प्रतापाने पोलिसही हादरून गेले आहेत. इंस्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून लोकांच्या भावनांशी खेळणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. या आरोपीच्या प्रतापामुळे एका तरुणाचे लग्न रखडले. याबद्दल संबंधित तरुणाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोशल मीडिया सेलच्या मदतीने आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

यासंदर्भात मैनपुरीच्या किश्नी पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या हर्ष कुमारने पोलिसांकडे तक्रार केली. त्याने तक्रारीत म्हटले की, आरोपीने इन्स्टाग्रामवर माझा फेक आयडी बनवला आणि माझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले. त्याच्या या प्रतापामुळे समाजात सर्वांसमोर माझी संपूर्ण प्रतिमा मलीन झाली आहे. इतकेच नव्हे तर लग्न मोडावे म्हणून तो माझ्या होणाऱ्या पत्नीविरुद्ध अश्लील गोष्टी करू लागला ​​होता. कोणत्याही परिस्थितीत माझे लग्न मोडणे, एवढीच कुटील भावना त्याने मनात ठेवली होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी सायबर गुन्हेगाराची गठडी वळण्यासाठी विशेष तपासकार्य सुरु ठेवले.

गुन्ह्याचा हेतू ऐकून पोलिसही चक्रावले

पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले. त्याआधारे पोलिसांनी सुमित कुमार शाक्य ( रा. फकिरेपूर पोलीस स्टेशन करहाळ) याला अटक केली. चौकशीत आरोपीने सांगितले की, तक्रारदाराची होणारी पत्नी ही आरोपीच्या दूरच्या नात्याची बहीण आहे आणि तिचे लग्न मोडण्याच्या उद्देशाने तो हे सर्व करत होता. त्याच्या या कटकारस्थानाने सर्वांनाच धक्का बसला. आर्थिक फसवणुकीपाठोपाठ एकमेकांच्या दुष्मनीतून बदला घेण्यासाठीही सायबर गुन्हेगारीचा वापर होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या अनुषंगाने सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Groom’s fake account opened on Instagram to break up sister’s marriage)

इतर बातम्या

UP Crime: एकतर्फी प्रेमातून विद्यार्थीनीची हत्या; दोन मित्रांच्या मदतीने प्रियकराने रचला कट

UP Crime : प्रियकराशी भांडण करून प्रेयसी ट्रकमधून खाली उतरली अन् जीवाला मुकली, वाचा नेमके काय घडले?

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.