Varun Singh Passed Away | हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन
जनरल बिपीन रावत यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Group Captain Varun Singh) यांचे निधन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली
नवी दिल्ली : संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Group Captain Varun Singh) यांचे निधन झाले. बंगळुरुतील रुग्णालयात आठवड्याभराच्या उपचारांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. 8 डिसेंबरला तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते.
Group Captain Varun Singh, the lone survivor of #TamilNaduChopperCrash – who was under treatment at Command Hospital in Bengaluru – passes away at the hospital. pic.twitter.com/l8XsiihL5k
— ANI (@ANI) December 15, 2021
वरुण सिंह यांच्या निधनाने अतीव दुःख झाल्याच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.
Group Captain Varun Singh served the nation with pride, valour and utmost professionalism. I am extremely anguished by his passing away. His rich service to the nation will never be forgotten. Condolences to his family and friends. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2021
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून वरुण सिंह यांना श्रद्धांजली
#WATCH | Uttarakhand: Defence Minister Rajnath Singh & others present at ‘Shaheed Samman Yatra’ event in Dehradun observe a minute’s silence & pay tribute to Group Captain Varun Singh who passed away at Bengaluru Command Hospital today.
#TamilNaduChopperCrash pic.twitter.com/1mjYQj6TH5
— ANI (@ANI) December 15, 2021
‘अमर रहे… अमर रहे… जनरल अमर रहे’, ‘वंदे मातरम…’ ‘भारत माता की जय…’ ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा…’ ‘बिपीनजी अमर रहे…. अमर रहे, अमर रहे….’अशा घोषणांच्या पार्श्वभूमीवर जनरल बिपीन रावत यांना दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत 10 डिसेंबरला अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिला.
लष्करी अधिकाऱ्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात
हेलिकॉप्टर अपघाताआधी पायलटने कोणताही मे डे कॉल केला नव्हता. मे डे कॉल हा इमर्जन्सीवेळी कंट्रोल रुमल केला जातो. कोणताही तांत्रिक बिघाड किंवा संकट ओढावलं तर क्रू मेंबर कंट्रोलरुमला संपर्क करतात. आणि तीन वेळा मे डे असा शब्द उच्चारतात. मात्र या अपघातावेळी क्रू मेंबर्सकडून कोणताही मे डे कॉल आला नसल्याची माहिती आहे. जिथं अपघात घडला त्या कुन्नूर भागात सैन्याची छावणी आहे. इथल्याच एका कार्यक्रमात बिपीन रावत हजर राहणार होते. विशेष म्हणजे अपघातस्थळापासून लँडीगचं ठिकाण फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यामुळे अपघाताआधी हेलिकॉप्टर लँडिंगच्या तयारीत असल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
इतर बातम्या: