AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lithium नंतर देशात सोन्याचे भंडार, काय देश सौदी अरेबियासारखा श्रीमंत होईल

GSI मागील दोन वर्षांत या तीन जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकवेळा सर्वे केला. त्यात सोन्याच्या खाणी असल्याचे स्पष्ट झाले. परंतु या खाणींमध्ये किती सोने आहे, हे अद्याप स्पष्ट नाही.

Lithium नंतर देशात सोन्याचे भंडार, काय देश सौदी अरेबियासारखा श्रीमंत होईल
आजचा भाव काय
| Updated on: Feb 28, 2023 | 2:29 PM
Share

नवी दिल्ली : देशात लिथियम (Lithium) धातूचे साठे असल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वीच मिळाला होता. खाणीतील लिथियमची क्षमता 59 लाख (5.9 दशलक्ष) टन एवढी आहे. लिथियम सोबतच सोन्याचे (Gold) 5 ब्लॉकदेखील सापडले होते. यासंदर्भात जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (GSI) ने अहवाल दिला होता.आता आणखी एक अहवाल आला आहे. त्यात देशात सोन्याच्या खाणी मिळाल्या आहे. तीन जिल्ह्यांमध्ये या खाणी आहेत. ओडिशामधील देवगढ, क्योंझर व मयूरभंज येथे सोन्याच्या खाणी असल्याची माहिती मिळाली आहे.

कुठे मिळाले सोने

ओडिशामधील क्योंझर जिल्ह्यांमधील दिमिरिमुंडा, कुशकला, गोटीपूर, गोपूर तर मयूरभंज जिल्ह्यात जोशीपूर, सुरियागुडा, रुआंसिला, धुशूरा पहाडी व देवगढमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. यासंदर्भातील सर्वे 1970 व 80 च्या दशकात झाला होता. परंतु तो सार्वजनिक केला गेला नव्हता.

खाण केंद्रीय कोळसा आणि खाणकर्म राज्यमंत्री प्रफुल्ल कुमार मलिक यांनी सांगितले की, GSI मागील दोन वर्षांत या तीन जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकवेळा सर्वे केला. त्यात सोन्याच्या खाणी असल्याचे स्पष्ट झाले. परंतु हे सोने किती आहेत, ती माहिती मिळाली नाही. या ठिकाणी मुबलक सोने मिळाल्यास भारत सौदी अरेबियासारखा श्रीमंत देश होईल.

लिथियममुळे काय होणार

देशात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये लिथियमचा एवढा मोठा साठा सापडला होता. मोबाईल फोन असो की सोलर पॅनेल, सर्वत्र लिथियमचा वापर होतो. देशाला लागणाऱ्या लिथियमपैकी ८० टक्के फक्त चीनकडून आयात करावे लागते. २० टक्के इतर देशांकडून आयात केले जातात. लिथियम मिळाल्यामुळे देश स्वयंपूर्ण होण्याकडे महत्वाचे पाऊल पडणार आहे.तसेच सोन्याचे साठे मिळाल्यामुळे सोने आयात कमी होईल.

मोबाइल फोन, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये लिथियमचा वापर केला जातो. याशिवाय खेळणी आणि घड्याळांसाठीही याचा वापर होतो. सध्या भारत लिथियमसाठी पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहे. चीनकडूनही सर्वात जास्त ८० टक्के लिथियम भारत आयात करतो. यासाठ्यामुळे चीनवरील भारताचे अवलंबित्व कमी होणार आहे. लिथियमसंदर्भात भारत स्वयंपुर्ण होण्यास मदत मिळणार आहे.

लिथियम आयातीत भारत चौथा

भारतात मोठ्या प्रमाणावर लिथियमची आयात केली जाते. २०२० पासून भारत लिथियम आयातीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. यापैकी ८० टक्के भाग चीनकडून मागवला जातो. आत्मनिर्भन बनण्यासाठी हे लिथियम अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया, बोलिव्हिया आदी देशांकडून खरेदी करण्याचा भारताचा विचार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.