काँग्रेसच्या काळात 1 जीबी डेटाची किंमत 300 रुपये होती, आता तिच किंमत 10 रुपये झालेय…

गुजरात विधानसभा तोंडावर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, गुजरातच्या जनतेने कधीही कुणालाही दुखवण्याचा प्रयत्न केला नाही.

काँग्रेसच्या काळात 1 जीबी डेटाची किंमत 300 रुपये होती, आता तिच किंमत 10 रुपये झालेय...
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 1:23 AM

वलसाडःगुजरात विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. त्यातच नरेंद्र मोदींनी गुजरात दौरा काढल्यानंतर भाजपच्या प्रचाराला आणखी वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वलसाड जिल्ह्यात झालेल्या एका सभेला संबोधित करताना सांगितले की, या राज्यातील गुजराती लोकांनी कधीही कुणालाही दुखावले नाही, आणि जो कोणी गुजरातमध्ये येईल त्याचे मोठ्या मनाने स्वागत केले आहे आणि त्याला प्रेमाने, मायेने जवळ घेतले आहे. मात्र ज्या लोकांकडून गुजरातची बदनामी केली जाते आहे. आमच्या विरोधात बोलले जात आहे.

त्या व्यक्तींपासून मात्र सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. जी लोकं आमच्या विरोधात बोलत आहेत. ती लोकं गुजरात आणि गुजराती लोकांना बदनाम करत आहेत.

त्यामुळे ते आमची बदनामी परदेशातही करत असल्याचा टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे. त्यामुळे त्यांनी बदनामीची भाषा थांबवायला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केले.

गुजरात विधानसभा तोंडावर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, गुजरातच्या जनतेने कधीही कुणालाही दुखवण्याचा प्रयत्न केला नाही.

गुजराती माणसं कुठेही गेली तर ती दुधात साखर विरघळल्यासारखे मिसळून जातात. आणि आमच्या राज्यात जर कोणी बाहेरची लोकं आली तर त्याला प्रेमानं जवळ घेतात, मायेनं मिठी मारतात असंही नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितले.

विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले आहे की, ज्यांनी गुजरातची बदनामी केली आहे. त्या लोकांना राज्यात कुठेही एकही जागा मिळू शकत नाही असं टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

गुजरातला मागे घेऊ जाऊ पाहणाऱ्यांना आणि तसा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही कधीही स्वीकारू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वीच्या काँग्रेसच्या राजवटीत एक जीबी डेटा हा 300 रुपयेला होता.

आता त्याची किंमत फक्त 10 रुपये आहे आणि सध्या मासिक डेटा वापराचे बिल 250 ते 300 रुपये आहे. आणि जर या काळात काँग्रेस सत्तेत आली असती तर 5000 रुपयांपेक्षा जादा दर घेतले असते. तर या निवडणुकीत भाजप विजयाचा नवा इतिहास रचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.