सावध ऐका पुढल्या हाका; केजरीवालांनी ‘या’ नेत्याच्या घरातच जाऊन दिला इशारा…

गुजरातमधील राजकीय वातावरणाविषयी बोलताना केजरीवाल म्हणाले की, भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्तेही आता पक्षावरच तीव्र नाराज आहेत.

सावध ऐका पुढल्या हाका; केजरीवालांनी 'या' नेत्याच्या घरातच जाऊन दिला इशारा...
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 10:54 PM

अहमदाबादः आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal), पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नरेंद्र मोदींच्या थेट गुजरातमध्ये जाऊनच त्यांना इशारा दिला आहे. आज गुजरातमधील वलसाड आणि सुरतमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की आता सगळ्या गुजरातमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, गेल्या सहा महिन्यामध्ये आमच्या मागे संपूर्ण गुजरात उभा राहिला आहे. त्यामुळे आता त्यांनी बदलाची मागणी केली आहे.त्यामुळे वर आकाशातही स्वच्छता चालू झाली असून आता तुमचा अहंकार हा गळून पडणाराच आहे.

गुजरातमधील जनतेवर अत्याचार केले गेले आहेत, त्यांना ठारही मारलं गेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला एक संधी द्या, आणि तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने जगा असं अश्वासनंही त्यांनी दिले.

गुजरातमधील राजकीय वातावरणाविषयी बोलताना केजरीवाल म्हणाले की, भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्तेही आता पक्षावरच तीव्र नाराज आहेत.

त्यामुळे त्यांना भाजपचा पराभव करायचा आहे. त्यामुळे त्यांना मला त्यांना सांगायचे आहे की, तुम्ही भाजपमध्ये राहूनच भाजपचा पराभव करा.

आता गुजरातमध्ये नवा पक्ष, नवे चेहरे, नवे विचार आणि नवी पहाट येणार असल्याचाही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

त्यामुळे आता नवा गुजरात घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आता गुजरातमध्ये शांतताप्रिय सरकार आणावे लागणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज गुजरातमधील वलसाड आणि सुरतमधील दोन जाहीर सभांना संबोधित केले.

वलसाडमधील जाहीर सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, एका पोलिसांनी मला सांगितले की या सभेला सुमारे दीड लाख लोक आले आहेत. आणि हे सगळे लोक आपला वेळ काढून ते इथे आले आहेत.

आम्ही कुणाला पैसे दिलेले नाहीत, तर हे लोक पैसे देऊन लोक गोळा करत असतात. प्रत्येकजण आपापल्या इच्छेने आणि गुजरातमधील बदलासाठी येथे आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे मी गुजरातच्या जनतेचा ऋणी असल्याचेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार बनताच आम्ही जी अश्वासनं दिली आहेत ती आधी पूर्ण करु.

तुमच्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी आम्ही येथे येऊ. जी गुजरातच्या साडेसहा कोटी जनता आमच्या सोबत असणार आहे त्या जनतेला घेऊन आम्ही नवा गुजरात घडवू असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

आयबीने गुजरातमध्ये फेरफटका मारला आणि यावेळी निवडणुकीत तुम्ही कोणाला मत देणार, असा सवालही त्यांनी जनतेला केला.

येत्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचेच सरकार स्थापन होणार असल्याचा अहवालही आयबीने दिला असल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.