Gujarat | माजी मंत्र्याला मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन महागात, 1 हजार लोक थेट रुग्णालयात, काय आहे नेमका प्रकार?
गुजरातमधील काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये आलेल्या 1 हजार पेक्षा जास्त लोकांना सोहळ्यातून थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून काँग्रेसच्या माजी मंत्र्याला मुलाचं रिसेप्शन चांगलच महागात पडलंय. गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हा प्रकार घडला आहे. यामध्ये तब्बल 1 हजार पेक्षा जास्त लोक आजारी पडले आहे.
गुजरात : आता नेतेमंडळींच्या मुलाचं लग्न म्हणलं की गाजावाजा आणि मोठेपणा आलाच. मात्र, गुजरातमधील (Gujarat) काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये (Reception)आलेल्या 1 हजार पेक्षा जास्त लोकांना सोहळ्यातून थेट रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं. या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून काँग्रेसच्या माजी मंत्र्याला मुलाचं रिसेप्शन चांगलच महागात पडलंय. गुजरातच्या मेहसाना (Mehsana) जिल्ह्यातील एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हा प्रकार घडला आहे. यामध्ये तब्बल 1 हजार पेक्षा जास्त लोक आजारी पडले आहे. आजारी पडलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. काहीही असलं तरी माजी मंत्र्याच्या मुलाच्या लग्नात असा प्रकार झाल्यानं गुजरातमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
पदार्थ खाने महागात
आता लग्न म्हटलं की पदार्थ आलेच. त्यात नेते किंवा मंत्र्यांच्या कुटुंबातील लग्न असल्यानं सगळं निटनेटकं असणारच. पण गुजरातमध्ये हा विश्वास ठेवणं 1 हजारपेक्षा जास्त लोकांना महागात पडलं आहे. मेहसाना जिल्ह्यातील विसगर तालुक्यातल्या विसनगर पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आलं की, काँग्रेसचे माजी मंत्री वजीर खान पठाण (Wazir Khan Pathan) यांच्या मुलाचं लग्न 3 मार्चला झालं. त्यानंतर त्यांनी 4 मार्चला लग्नाचं रिसेप्शन दिलं. आता माजी मंत्र्यांच्या मुलाचं लग्न असल्यानं लोक तर येणार. वजीर खान पठाण यांनी 12 ते 15 हजार नातवेईकांना रिसेप्शनसाठी बोलावलं. मात्र, यातील 1 हजार 57 लोकांना अन्नातून विषबाधाचे लक्षण दिसून आले. यानंतर त्यांना तातडीनं गांधीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
…तर होऊ शकते शिक्षा
एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगतिलं की, या प्रकरणाची तक्रार आयोजक किंवा पीडित व्यक्तीकडून केली जाते. पीडित रिसेप्शमध्ये जेवण्या बनवण्याऱ्यांविरोधात तक्रार देऊ शकतो. त्याची आणि इलाज करण्याची भरपाई देखीव मागीतली जाऊ शकते. या संपूर्ण प्रकारात कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. जवळपास 1 हजार 250 लोकांना याचा त्रास झाला आहे.
आरोग्यमंत्र्यानी रुग्णांची घेतली भेट
एका पेपरच्या बातमीनुसार, या प्रकरणी मेहसाना जिल्ह्यातील मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यातच आरोग्यमंत्री ऋषीकेश पटेल यांच्या कार्यालयाकडून आलेल्या निवेदनात म्हणण्यात आलं आहे. की, याप्रकरणी माहिती मिळताच रुग्णालयाला भेट देऊन विचारपूस केली. दरम्यान, आता याप्रकरणी चौकशीअंती काय समोर येतं, हे पाहणं महत्वाचं ठरेल.
इतर बातम्या