Accident : भयानक अपघात, ट्रकमध्ये घुसली मागून येणारी कार, पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर

Accident : एका भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. मागून कार इतक्या वेगात आली की, पुढे जाणाऱ्या ट्रकमध्ये घुसली. कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. त्यावरुन अपघाताची भीषणता लक्षात येते.

Accident : भयानक अपघात, ट्रकमध्ये घुसली मागून येणारी कार, पत्रा कापून मृतदेह काढले बाहेर
Road Accident
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 9:46 AM

एक भीषण अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मागून प्रचंड वेगात आलेली कार पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली. अपघाताच्यावेळी कारचा स्पीड इतका होता की, अर्धी कार ट्रकमध्ये घुसली. या अपघातात कारमध्ये बसलेल्या 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय. गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी एका जखमीला रुग्णालयात हलवलं. त्याची प्रकृती नाजूक आहे. कार चालकाचा डोळा लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे. सध्या पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये एकूण 8 जण होते. शामलाजी येथून ते सर्व अहमदाबादला चाललेले. पोलिसांनी जखमी आणि मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पहाटे 4.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारच चेंदामेंदा झाला आहे. अपघाताच्या वेळी कारचा स्पीड अंदाजे 120 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.

अपघाताच कारण काय?

कारचा पुढचा भाग ट्रकमध्ये घुसला. पोलीस आणि फायर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले. साबरकांठाचे एसपी विजय पटेल यांच्यानुसार, माहिती मिळताच पोलीस टीम घटनास्थळी पाठवण्यात आली होती. पोलिसांनी लगेच जखमीला रुग्णालयात हलवलं. गाडीमधून मृतदेह काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जखमी आणि मृतांची ओळख पटली आहे. कार चालकाची झोप हे अपघातामागच कारण असू शकतं, असं पोलीस अधिकारी म्हणाले. अपघाताच्यावेळी ट्रकचा स्पीड सामान्य होता, असं पोलीस म्हणाले.

भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.
म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान
म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान.
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'.
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या.
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?.
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.