Surat Chemical Leak | सुरतमध्ये टँकरमधून गॅस गळती, चार कामगारांचा गुदमरुन मृत्यू, 25 जण गंभीर

गॅस गळती झाल्याने गिरणीतील चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सुरतमधीस सचिन परिसरात विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

Surat Chemical Leak | सुरतमध्ये टँकरमधून गॅस गळती, चार कामगारांचा गुदमरुन मृत्यू, 25 जण गंभीर
सुरतमध्ये वायूगळती
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 8:27 AM

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये गुरुवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. सचिन परिसरात असलेल्या विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलजवळ टँकरमधून गॅस गळती (Surat Chemical Leak) झाल्याने गिरणीतील चार कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे, तर 25 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

काय आहे प्रकरण?

सुरतमधीस सचिन परिसरात विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिलजवळील नाल्यात एक टँकर चालक विषारी रसायनं टाकत होता. यावेळी त्यातून विषारी वायूची गळती सुरु झाली. त्यामुळे जवळच असलेल्या गिरणीच्या कर्मचाऱ्यांनाही लागण झाली.

गुदमरल्यामुळे चौघा जणांचा मृत्यू

सध्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात घबराट पसरली होती. प्राथमिक माहितीनुसार, गुदमरल्यामुळे चौघा जणांना प्राण गमवावे लागले.

गुजरातमध्ये वायू गळतीची पुनरावृत्ती

याआधी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका कपड्याच्या कारखान्यात रासायनिक टाकी साफ करताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादच्या ढोलका येथील चिरीपाल ग्रुपच्या विशाल फॅब्रिक युनिटमध्ये हा अपघात झाला. या अपघातात गॅस गळती कुठून झाली, हे समजू शकले नव्हते.

संबंधित बातम्या :

चोरीला गेलेली सोनसाखळी मिळाली, चोरट्याला बेड्या, अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याकडून पोलिसांचे आभार

डॉकयार्ड रोड स्टेशनवर महिलेचा गळा चिरणारा सापडला, 23 वर्षीय एक्स बॉयफ्रेण्डकडून हल्ला

नागपूर शहर आणि शहरालगतच्या तालुक्यांतील एक ते आठच्या शाळा महिनाभरासाठी बंद; आणखी काय नियम आहेत 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.