जोरदार आवाज अन् सहा मजली इमारत कोसळली, सात जणांचा मृत्यू, घटनास्थळावर NDRF अन् SDRF ची टीम
building collapses in surat: गुजरातमधील सुरतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. शहरात सहा मजली इमारत कोसळली आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहचली आहे. आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहेत.
गुजरातमधील सुरतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. शहरात सहा मजली इमारत कोसळली आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोहचली आहे. आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहेत. परंतु ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी, सुरत महापालिकेचे महापौर दक्षेश मावाणी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजप आमदार संदीप देसाई, विरोधी पक्षनेत्या पायल साकारिया आणि अन्य नेतेही घटनास्थळी पोहोचले.
आवाज आला अन् पळापळ
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, बिल्डींग काही वर्ष जुनी होती. त्यानंतर त्यामध्ये दहा ते १५ कुटुंब राहत होते. शनिवारी अचानक मोठा आवाज आला आणि बिल्डींग पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. परिसरात सर्वत्र धुळीचे कण तयार झाले. नागरिकांची पळपळ सुरु झाली. संपूर्ण बिल्डींग पूर्णपणे क्षतीग्रस्त झाली. घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु झाले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पोहचली.
रात्रभर ढिगार उपसण्याचे काम
घटनेनंतर रात्रभर बिल्डींगचा ढिगारा काढण्याचे काम सुरु होते. ढिगाऱ्याखाली अजूनही खूप लोक अडकले असण्याची भीती आहे. घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
#WATCH | Gujarat: Surat DCP Rajesh Parmar says, "Rescue operation has been going on for 12 hours. One woman has been saved and 7 dead bodies have been recovered and sent for post-mortem… We are clearing the debris…" https://t.co/HVUp7jB6ro pic.twitter.com/609Qf7wYUt
— ANI (@ANI) July 7, 2024
सहा वर्ष जुनी बिल्डींग
बिल्डींग २०१७ मध्ये बांधण्यात आली होती. केवळ सहा वर्षांत २०२४ मध्ये ती पडली. या बिल्डींगमध्ये मजुरी करणारे लोकच भाड्याने राहत होते. बिल्डींच्या पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते. महानगरपालिकेने यापूर्वीच घरमालकांना नोटीस दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
#UPDATE | Gujarat: Chief Fire Officer, Surat, Basant Pareek says, "…The search operation continued throughout the night. Seven dead bodies have been recovered…" https://t.co/HVUp7jB6ro pic.twitter.com/X6ojSZAu1a
— ANI (@ANI) July 7, 2024
एका महिलेस वाचवले
सुरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी रात्रभर ऑपरेशन सुरु होते. त्यावेळी एका महिलेची आवाज आली. अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी त्या महिलेस ढिगाऱ्याखालून सुरक्षित काढले. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.