गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक निर्णय, मुख्यमंत्रीच नाही तर स्पीकर, मंत्री सगळे बदलले, उपमुख्यमंत्री नितीन पटेलांनाही जागा नाही

भारतीय राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने गुजरातमध्ये हा प्रयोग केला आहे. पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गुजरात विधानसभेच्या निवडणुका लागत आहे, त्याच पार्श्वभूमीवर भाजपने हा डाव टाकला आहे.

गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक निर्णय, मुख्यमंत्रीच नाही तर स्पीकर, मंत्री सगळे बदलले, उपमुख्यमंत्री नितीन पटेलांनाही जागा नाही
Bhupendra Patel
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 4:05 PM

अहमदाबाद : गुजरातमध्ये मु्ख्यमंत्री ( Chief Minister Gujrat) बदलानंतर मंत्रिमंडळाचाही ( Gujrat Cabinate )चेहरा-मोहराही पूर्णपणे बदलण्यात आला आहे. बीजेपीने आपल्या नो रिपीट फॉर्म्युला ( No Repeat Formula) अंतर्गत संपूर्ण मंत्रिमंडळ बदललं आहे. विजय रुपाणींच्या ( Vijay Rupani ) जागी नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल ( Bhupendra Patel ) विराजमान झालेत, विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नितीन पटेल ( Nitin Patel ) यांनाही मंत्रिमंडळात कुठलंच मंत्रिपद देण्यात आलं नाही. जुन्या मंत्र्यांच्या जागी नवीन मंत्री आले आहेत. एवढंच नाही तर विधानसभेच्या अध्यक्षांनाही बदलण्यात आलं आहे. भारतीय राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने गुजरातमध्ये हा प्रयोग केला आहे. पुढच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात गुजरात विधानसभेच्या निवडणुका लागत आहे, त्याच पार्श्वभूमीवर भाजपने हा डाव टाकला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच कळेल की, या मंत्रीमंडळ बदलाचा काही फायदा होती की नाही. (Gujarat the entire cabinet Chief Minister and the Speaker of the Legislative Assembly has changed Deputy Chief Minister Nitin Patel also has no place. )

पटेलांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री कोण?

भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील एकूण 24 मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यातील 10 कॅबिनेट मंत्री आहेत तर 14 राज्यमंत्री. राजेंद्र त्रिवेदी, जितू वाघाणी, नरेश पटेल, पूर्णेश मोदी, राघव पटेल, अर्जुन सिंह चौहान, ऋषिकेश पटेल, प्रदीप सिंह परमार, कनुभाई देसाई आणि किरीट सिंह राणा यांनी शपथ घेतली.

पटेलांच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री कोण?

तर राज्यमंत्री म्हणून, विनोद भाई मोराडिया, राघवजी मकवाना, देवा भाई मालम, गजेंद्र सिंह परमार, किर्ती सिंह वाघेला, कुबेर डिंडोर, अरविंद रैयाणी, मुकेश पटेल, जितू चौधरी, निमिशा सुतार, मनीषा वकील, जगदीश पांचाळ, हर्ष सांघवी आणि वृजेश मेरजा यांचा समावेश आहे.

विधानसभा अध्यक्षही बदलले

मुख्यमंत्री आणि फक्त मंत्रिमंडळच नाही तर भाजपने गुजरातमध्ये विधानसभा अध्यक्षांनी हटवलं आणि त्यांच्या जागी नव्या अध्यक्षांना बसवलं आहे. 2017 पासून गुजरात विधानसभेचे अध्यक्ष असणाऱ्या राजेंद्र त्रिवेदी यांनी गुरुवारी राजीनामा दिला होता. त्यांना नव्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. राजेंद्र त्रिवेदींच्या रिकाम्या झालेल्या जागेवर भाजपने निमा आचार्य यांना बसवलं आहे. आचार्य यांनी विधानसभा अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे.

राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून गुजरातचा वापर?

गुजरात आधीपासून राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून ओळखलं जातं. कारण, इथं पारंपरिक राजकारणाला सोडून रिस्क घेतली जाते आणि त्यातून जिंकण्याचे नवे फॉर्म्युले तयार होतात. भाजपने आधी नो रिपीटचा फॉर्म्युला गुजरातच्या मनपा निवडणुकीत वापरला होता. ज्यात निवडणुकीपूर्वी जुन्यांना हटवून नव्यांना संधी देण्यात आली होती. ज्याचा पक्षाला चांगलाच फायदाही झाला. त्यामुळेच 2017च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला गुजरातमध्ये कडवं आव्हान देणाऱ्या काँग्रेसचा सुपडा साफ झाला.

दिल्लीतही भाजपने वापरला होता नो रिपीट फॉर्म्युला

2017 च्या दिल्ली मनपा निवडणुकीतही भाजपने हा फॉर्म्युला वापरला होता. आधीच्या सर्व लोकप्रतिनिधींना तिकीट न देता भाजपने सगळे नवे चेहरे दिले. त्याचा फायदाही भाजपला झाला. कारण, आम आदमी पक्ष जो दिल्लीत मजबूत अवस्थेत होता. त्याला भाजपने चांगलंच खिंडार पाडलं. आणि तोच फॉर्म्युला आता भाजप पुन्हा गुजरातमध्ये वापरत आहे.

गुजरातमध्ये जातिय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न

गुजरातमध्ये विविध जातींचे लोक राहतात. त्यांच्या प्रत्येकाचा एक असा मतदार संघ आहे. मागील मंत्रिमंडळात सगळ्या जातींचे प्रतिनिधी नव्हते. शिवाय, गुजरातच्या दुर्गम भागातून आलेले मंत्रीही नव्हते. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हीच गोष्ट भाजपला धोकादायक ठरु शकते. हेच पाहता भाजपने पाटिदार समाजातील मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना घेतलंय. पटेल समाजाचे 6, ओबीसी समाजाचे 4, ब्राह्मण समाजातून 2, क्षत्रिय 3, आदिवासी समाजातून 4, मागासवर्गीय समाजातून 3 तर जैन समुदायाच्या एका आमदाराला मंत्री केलं आहे. आता यावरुनच तुम्हाला कळेल, की भाजपचा गुजरात विधानसभा निवडणुकीतला प्लान काय आहे.

संबंधित बातम्या:

भाजपवाले हिंदू, मग RSS विचारधारेने गांधींच्या छातीत 3 गोळ्या का घातल्या? : राहुल गांधी

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचं काम कधी पूर्ण होणार? नितीन गडकरींकडून हरियाणा, राजस्थानात कामाची पाहणी

 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.