VIDEO: सुरतच्या फॅक्ट्रीला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी मजुरांच्या पाचव्या मजल्यावरून उड्या; दोघांचा मृत्यू

हिरा नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमध्ये आज सकाळी सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. कडोदराच्या वरेलीमध्ये एका पॅकेजिंग युनिटला लागलेल्या भीषण आगीत दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. (Gujarat Workers jumped from the 5th floor to save their lives when a fire broke out in Surats packaging unit)

VIDEO: सुरतच्या फॅक्ट्रीला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी मजुरांच्या पाचव्या मजल्यावरून उड्या; दोघांचा मृत्यू
fire
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 10:15 AM

सुरत: हिरा नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमध्ये आज सकाळी सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. कडोदराच्या वरेलीमध्ये एका पॅकेजिंग युनिटला लागलेल्या भीषण आगीत दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. या आगीतून आता 125 जणांची सुटका करण्यात आली आहे. आग लागल्यानंतर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून मजुरांनी उड्या मारल्या. त्यात अनेक मजूर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

surat fire

surat fire

कडोदरामधील वरेली येथील एका पॅकेजिंग युनिटच्या पाचव्या मजल्यावर ही भीषण आग लागली. पाचव्या मजल्यावर काम सुरू असताना अचानक आग लागल्याने कामगार भयभीत झाले. काही मजुरांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

surat fire

surat fire

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांना हायड्रोलिक लिफ्टने खाली उतरवले. या आगीतून अनेकांना रेस्क्यू करण्यात आलं. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या एक डझनहून अधिक गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे.

surat fire

surat fire

धावपळ आणि हाहा:कार

फॅक्ट्रीत आग लागल्यानंतर मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. अचानक आग आणि धुराचे लोट पसरल्याने फॅक्ट्रीबाहेर पडण्यासाठी मजुरांची धावपळ उडाली. सर्वचजण सैरावैरा पळू लागले. मात्र, जिन्यातही आगीचे लोट आल्याने त्यांना बाहेर पडणं मुष्किल झाल. त्यामुळे काही मजुरांनी थेट इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उड्या मारल्या. त्यात अनेकजण जखमी झाले. आगी आणि धुरामुळे अनेक मजुरांना गुदमरल्यासारखे झाले. त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी! दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची आज टास्कफोर्ससोबत बैठक, दुकानं, लोकलबाबत मोठा निर्णय शक्य

शेतकऱ्यांना टोपी घालण्यात मोदी पवार सारखेच, राजू शेट्टींनी बाह्या सरसावल्या

टेम्पो-ट्रेलरच्या मधे स्वीफ्टचा चक्काचूर, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील घटना

(Gujarat Workers jumped from the 5th floor to save their lives when a fire broke out in Surats packaging unit 2 died)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.