वर्षाला 15 लाख पगार, मुंबईत मोठ्या कंपनीत नोकरी, सर्व सोडून सीए तरुणी बनली साध्वी

2014 मध्ये पायल शाह (Payal Shah) नावाची तरुणी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील एका बड्या कंपनीत नोकरी करत होती.

वर्षाला 15 लाख पगार, मुंबईत मोठ्या कंपनीत नोकरी, सर्व सोडून सीए तरुणी बनली साध्वी
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 1:52 PM

अहमदाबाद : मुंबई एका मोठ्या कंपनीत नोकरीवर असलेल्या 31 वर्षीय सीएने (CA Quits Rs 15 Lakh Per Annum Job) महिन्याला सव्वा लाखाचा पगाराची नोकरी सोडून दीक्षा (Diksha) घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याला सव्वा लाख म्हणजेच वर्षाला 15 लाख पगाराची नोकरी सोडून या सीए तरुणीने संन्यास दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला (CA Quits Rs 15 Lakh Per Annum Job).

2014 मध्ये पायल शाह (Payal Shah) नावाची तरुणी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील एका बड्या कंपनीत नोकरी करत होती. सीए म्हणून ती कार्यरत होती. सीएच्या परिक्षेत ऑल इंडिया रँकिंगमध्ये टॉप करणारी तरुणीने तिच्या आयुष्यासाठी एक वेगळा मार्ग निवडला. अचानक तिच्या आयुष्यात बदल झाला आणि तिच्या नवीन प्रवासाच्या सुरुवातीचा तयारी करण्यासाठी रोज तिने पाच किलोमीटर चालण्यास सुरुवात केली.

येत्या 24 फेब्रुवारीला पायल शाह तिच्या वर्तमान आयुष्याचा त्याग करणार आहे. ती तिच्या आयुष्यातील धन-ऐश्वर्य, सर्व मोहमायेचा त्याग करुन जैन साध्वी म्हणून दीक्षा घेणार आहे. नेहमी शुभ्र वस्त्र धारण करण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

सुरतमध्ये होणाऱ्या एका समारंभात ती ही दीक्षा घेणार आहे आणि आयुष्यभरासाठी साध्वी बनणार आहे. तिची प्रेरणा आणि शिक्षक गुरुजी पुज्य साध्वीजी प्राशमलोचनाश्रीजी यांच्याद्वारे ती या नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे.

वाळकेश्वरच्या एका कंपनीत तिला वर्षाला 15 लाखाचा पगार मिळत होता. म्हणजे महिन्याला तिला सव्वा लाख रुपये मिळत होते. पायल मूळची गुजरातची असून तिच्या वडिलांचं मुंबईत किचनवेअरचं स्टोअर आहे.

“माझा प्रवास सात वर्षांपूर्वी सुरु झाला. जेव्हा मी माझ्या घराजवळ राहणाऱ्या साध्वींच्या घरी जायला लागली. या साध्वी किती आनंदात आहेत, तेही एकही सुट्टी न घेता, मोबाईल फोनही न वापरता, मी हे पाहून आश्चर्यचकित झाली”, असं पायल शाहने तिच्या या निर्णयामागील पार्श्वभूमी सांगितली. ती त्या साध्वींसोबत राहायला लागली. “मी त्यांच्यासोबत वर्षभर तरी राहायलाच हवं, तेव्हाच माझा अंतर्गत प्रवास सुरु होईल”, असंही तिने सांगितलं.

CA Quits Rs 15 Lakh Per Annum Job

संबंधित बातम्या :

हे पहिल्यांदा घडतंय, हैदराबादच्या मशिदीत महिलांसाठी जीम!

अर्ध्याहून अधिक भारतीय तिबेटप्रती असंवेदनशील : सर्वेक्षण

परीक्षा न देताच आयएएस?; लोकसभा अध्यक्षांच्या मुलीने दिले ‘हे’ उत्तर

ऐकावं ते नवलच! लग्नाच्या पत्रिकेत चक्क गुगल पे-फोन पेचा क्यूआर कोड

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.