AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election | तेलही गेलं, तूपही गेलं, गुप्तेश्वर पांडेंना तिकीट नाहीच

ऐन निवडणुकीच्या तोंडावर जेडीयूमध्ये प्रवेश करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना नितीश कुमारांनी तिकीट दिलं नाही. (Gupteshwar pandey not get ticket JDU)

Bihar Election | तेलही गेलं, तूपही गेलं, गुप्तेश्वर पांडेंना तिकीट नाहीच
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 11:21 PM

पाटणा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारच्या पोलिस महासंचालकपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना मोठा धक्का बसला आहे. जेडीयूने आपली 115 जणांची उमेदवार यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही. त्यामुळे विधानसभेच्या मैदानात उतरु पाहणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंना मोठा धक्का बसलाय. (Gupteshwar pandey not get ticket JDU)

बिहार निवडणुकीच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. बिहारचे पोलिस महासंचालक म्हणून व्हीआरसी घेतल्यावर राजकारणात प्रवेश करण्याच्या अटकळी गुप्तेश्वर पांडे यांनी वारंवार फेटाळून लावल्या होत्या. परंतु जेडीयूमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. पण विधानसभा निवडणूक लढवण्याचं त्यांचं स्वप्न आता भंगलं आहे. जेडीयूच्या 115 उमेदवारांमध्ये पांडे यांचं नाव कुठेच नाही.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ठाकरे सरकार, आणि मुंबई पोलिसांवर कडाडून टीका करुन गुप्तेश्वर पांडे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. एकंदरितच त्यांना जेडीयूकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात होतं. परंतू जेडीयू उमेदवारांच्या आलेल्या यादीने पांडेंची साफ निराशा झाली आहे.

फेब्रुवारी 2021 ही त्यांची निवृत्तीची तारीख होती मात्र पाच महिने अगोदरच त्यांनी निवृत्ती घेणं पसंत केलं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वेच्छानिवृत्ती घेऊन तसंच आमदार होऊन राजकारणाच्या इनिंगला त्यांना धडाक्यात सुरुवात करायची होती.

बिहार विधानसभेच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) स्वेच्छानिवृत्ती घेतली. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हीआरएस (व्हॉलंटरी रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस) घेतल्याने पांडे राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करण्याची शक्यता बळावली होती. गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.

गुप्तेश्वर पांडे यांची कारकीर्द

गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म 1961 मध्ये बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गेरुबंध गावात झाला. पांडे यांनी पाटणा विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदवी संपादन केली. विशेष म्हणजे संस्कृतमधून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्णही झाले. त्यानंतर ते आयकर अधिकारी झाले. दुसर्‍या प्रयत्नात आयपीएस परीक्षा पास होऊन त्यांनी पोलिस सेवेत प्रवेश केला.

गुप्तेश्वर पांडे यांनी याआधी 2009 मध्येही व्हीआरएस घेतली होती. भाजपच्या तिकिटावर बिहारमधील बक्सर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा अपुरी राहिल्याने नऊ महिन्यांनी बिहार सरकारकडे त्यांनी आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यावेळी पांडे यांचा विनंती अर्ज मंजूर केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिहार पोलिस महासंचालकपदी रुजू झाले होते

बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान तर 10 नोव्हेंबरला निकाल आहे. या निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे जनता दलाकडून रिंगणात उतरु शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Gupteshwar pandey not get ticket JDU)

संबंधित बातम्या

Gupteshwar Pandey | बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा JDU मध्ये प्रवेश

अखेर गुप्तेश्वर पांडे-नितीश कुमारांची भेट, पक्षप्रवेश कधी? पांडे म्हणतात…

Gupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, राजकीय पक्ष ठरला!

Gupteshwar Pandey | बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.