Gyanvapi case | ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षकाराला मोठा झटका, न्यायालयाने काय दिला निर्णय?
Gyanvapi case | आता मुस्लिम पक्षकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतो. हिंदू पक्षाकडून वकील विष्णु शंकर जैन आज कोर्टात हजर झाले. जस्टिस रोहित रंजन अग्रवाल यांच्या बेंचने हा निर्णय सुनावलाय.
Gyanvapi case | वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिण तळघरात पूजा करण्यासाठी परवानगी देण्याच्या प्रकरणात अलाहाबाद हाय कोर्टाकडून मुस्लिम पक्षकाराला मोठा झटका बसलाय. हायकोर्टाने आज म्हणजेच सोमवारी मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळून लावली. व्यासजींच्या तळघरात पूजा चालू राहिलं. जस्टिस रोहित रंजन अग्रवाल यांच्या बेंचने हा निर्णय सुनावलाय.
हायकोर्टाच्या या निर्णयानुसार, ज्ञानवापी संदर्भात जिल्हा न्यायाधीशाचा जो आदेश होता, तो कायम राहील. पहिल्या आदेशानुसार, तळघरात पूजा सुरु राहिलं. आता मुस्लिम पक्षकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतो. हिंदू पक्षाकडून वकील विष्णु शंकर जैन आज कोर्टात हजर झाले. त्यांनी सांगितलं की, अलाहाबाद हाय कोर्टाने अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमेटीची (एआयएमसी) याचिका फेटाळून लावली.
पूजेला परवानगी देण्याविरोधात कोर्टात याचिका
मुस्लिम पक्षाने तळघरातील पूजेला परवानगी देण्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. याआधी हायकोर्टात 15 फेब्रुवारीला या प्रकरणात सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता.
सत्र न्यायालयाचा आदेश काय होता?
31 जानेवारीला जिल्हा कोर्टाच्या आदेशानुसार, तळघरात मुर्ती ठेऊन पूजा अर्चा सुरु झाली. याला मुस्लिम पक्षकाराने विरोध केला. मुस्लिम पक्षकाराने वाराणसी जिल्हा न्यायाधीशाचा आदेश असंवैधानिक ठरवला होता. त्यानंतर हे प्रकरण हाय कोर्टात गेलं. हिंदू पक्षाकडून सुप्रीम कोर्टात सीनियर एडवोकेट सी.एस वैद्यनाथन विष्णु शंकर जैन यांनी बाजू मांडली. मुस्लिम पक्षाकडून वकील सैयद फरमान अहमद नकवी आणि अधिवक्ता पुनीत गुप्ता यांनी बाजू मांडली.
पाच हिंदू महिलांची याचिका
वर्ष 2021 मध्ये पाच हिंदू महिलांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. महिलांनी ज्ञानवापी मशीद परिसरात पश्चिम भिंतीच्या मागे एका मंदिरात पूजा करण्याची आणि मुर्ती सुरक्षित ठेवण्याची परवानगी मागितली होती. 16 मे 2022 रोजी कोर्टाने नियुक्त केलेल्या एका आयोगाने काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशिदीच वीडियोग्राफिक सर्वेक्षण पूर्ण केलं. सर्वे दरम्यान परिसराच्या आत एक संरचना आढळली. हिंदू पक्षाने हे शिवलिंग असल्याचा दावा केला होता. मुस्लिम पक्षाने तो ज्ञानवापीमधला फव्वारा असल्याच म्हटलं होतं.
यावर्षी 1 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर व्यासजींच्या तळघरात पूचा अर्चा सुरु झाली. यावर्षी 29 जानेवारी रोजी ज्ञानवापी मशिदीच्या साइंटिफिक सर्वेक्षणाची मागणी करत चार हिंदू महिला सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या.