Gyanvapi masjid survey:ज्ञानवापीमध्ये ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ती जागा सील करण्याचे आदेश, कोर्ट म्हणाले- पुराव्यांशी छेडछाड होऊ नये
न्यायालयाने जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख आणि सीआरपीएफ यांना आदेश दिला आहे. त्यात म्हटले आहे की, शिवलिंग सापडलेली जागा सिल करण्यात आली आहे. मात्र त्या जागेला सुरक्षित करण्याची व्यवस्था करा. ती तुमची व्यक्तिगत जबाबदारी आहे.
वाराणसी : ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणामध्ये (Gyanvapi masjid survey) तिसऱ्या दिवशी शिवलिंग सापडले आहे. त्यानंतर कोर्टाने जिथे शिवलिंग सापडले ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने (Court) एका याचिकाकर्त्याच्या अर्जानंतर हे आदेश दिले आहेत. ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचा आज तिसरा दिवस आहे. सर्वेक्षणाच्या नंतर हिंदू पक्षकारांच्या बाजूने असलेले डॉ. सोहनलाल यांनी मोठा दावा केला आहे, ते म्हणाले की, आतमध्ये शिवलिंग (Shivling) सापडले आहे. आत्तापर्यंत आत जे शोधण्यात येतं आहे. त्यापेक्षा जास्त सापडण्याची शक्यता आहे. आता पश्चिमच्या भिंतीच्या जवळ 75 फूट उंच, 30 फूट रुंद आणि 15 फूट लांब छिगारा आहे, त्याचा सर्वे करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. तर वाराणसी कोर्टाच्या म्हणण्यानुसार, हिंदू पक्षाने दावा केला आहे की, मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडले आहे. हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे, त्यामुळे सीआरपीएफ कमांडंटला तेथे मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचे आदेश द्यावेत. केवळ 20 मुस्लिमांना नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी आणि त्यांना वजू करण्यापासून ताबडतोब थांबवावे.
तत्काळ प्रवेशावर बंदी घालावी
तर हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, जेथे शिवलिंग सापडले आहे त्या जागेवर मुस्लिमांना जाण्यापासून तात्काळ रोकावे. त्यासाठी न्यालयाने वाराणसी जिल्हाधिकारी यांना आदेश द्यावा. तसेच जे शिवलिंग सापडले आहे ते सुरक्षित करण्यात यावे. तसेच यानंतर हिंदू पक्षाकडून यावर प्रतिज्ञापत्र देताच न्यायालयाने ती जागा सिल करण्याचे आदेश वाराणसी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. तसेच तेथे कोणालाही जाऊ देऊ नये असेही सांगण्यात आले आहे.
शिवलिंग सुरक्षित करण्याची व्यवस्था करा
याचबरोबर न्यायालयाने जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख आणि सीआरपीएफ यांना आदेश दिला आहे. त्यात म्हटले आहे की, शिवलिंग सापडलेली जागा सिल करण्यात आली आहे. मात्र त्या जागेला सुरक्षित करण्याची व्यवस्था करा. ती तुमची व्यक्तिगत जबाबदारी आहे.
हिंदू पक्षकारांकडून मोठा दावा
तथा आज ज्ञानवापी मशीदीतील सर्वेक्षणाचा तिसरा दिवस होता. सर्वेक्षणामध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांच्या वकीलांकडून करण्यात आला आहे. त्यावर हिंदू पक्षकारांचे वकील म्हणाले, सर्वेक्षणादरम्यान विहीरीत शिवलिंग सापडले. त्याची सुरक्षा व्हावी यासाठी आम्ही न्यायालयात जात आहोत. त्यानंतर लगेच त्यांनी वाराणसी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात त्यांनी न्यायालयास सांगितले की ज्ञानवापी मशीदीतील सर्वेक्षणात शिवलिंग सापडले आहे. त्यामुळे त्याची सुरक्षततेसाठी सीआरपीएफ जवानांना ही जागा सील करण्याचे आदेश देण्यात यावेत. त्यानंतर न्यायाधीश रवि कुमार दिवाकर यांनी ती जागा सील करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर न्यायालयाने जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख आणि सीआरपीएफ यांना जागा सील करण्याचे आदेश दिला आहे.
हिंदू पक्षकार म्हणाले – बाबा मिळाले
तत्पूर्वी, वाराणसीतील ज्ञानवापी कॅम्पसचे सर्वेक्षण सोमवारी तिसऱ्या दिवशी पूर्ण झाले. सर्वेक्षणानंतर हिंदू पक्षाचे वकील डॉ. सोहनलाल यांनी बाहेर येऊन मोठा दावा केला. ते म्हणाले, आमच्या बाजून मजबूत असे पुरावे सापडले आहेत. तर नंदी ज्यांची वाटत पाहत होता. ते बाबा आज सापडले. ते ‘बाबा आत सापडले. जिन खोजा तीन पैय्या. म्हणजे ज्यांना शोधलं जात होतं. त्यापेक्षा अधिकच सापडलं आहे. इतिहासकारांनी लिहलं होतं ते सत्य आहे. हिंदू पक्षाचे वकील डॉ. सोहनलाल यांनी सांगितलं, पश्चिमेकडील भिंतीजवळ 15 फूट उंच ढिगाऱ्याचेही सर्वेक्षण व्हायला हवे.