Gyanvapi | काशी अयोध्याचा मार्गावर ज्ञानवापी, मशिदीत मंदिराचे पुरावे, पुरातत्व विभागाच्या रिपोर्टमध्ये नेमके काय

Gyanvapi | अयोध्यात राम मंदिर झाले आहे. ५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम मंदिर तयार झाले. आता काशीमधील ज्ञानवापी मशिदीबाबत भारतीय पुरातत्व विभागाचा अहवाल आला आहे. त्या ठिकाणी मंदिर असल्याचे अनेक पुरावे अहवालात दिले आहे.

Gyanvapi | काशी अयोध्याचा मार्गावर ज्ञानवापी, मशिदीत मंदिराचे पुरावे, पुरातत्व विभागाच्या रिपोर्टमध्ये नेमके काय
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 8:13 AM

नवी दिल्ली, दि.26 जानेवारी 2024 | ज्ञानवापी मशीद संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाचा (ASI) रिपोर्ट आला आहे. या अहवालातून ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिरच होते. मंदिर पाडून मशीद उभारण्यात आली आल्याचे स्पष्ट झाले आहे. मंदिर असल्याचे 32 पेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत. 32 शिलालेखमधून हिंदू मंदिर असल्याचे स्पष्ट होत आहे. हा अहवाल दोन्ही पक्षांना एएसआयने दिला आहे. मशीद बांधताना हिंदू मंदिरातील खंबे थोड्याप्रमाणात बदलण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या अहवालातील काही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अयोध्या  निकालाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

मुख्य प्रवेशद्वारावर काय मिळाले

ज्ञानवापीत मंदिर असताना एक मोठा केंद्रीय कक्ष होता. तसेच उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागात एक एक खोली होती. त्यातील उत्तर, दक्षिण आणि पश्चिम विभागातील अवशेष मिळाले. परंतु पूर्व विभागाचे अवशेष अजून मिळाले नाही. मंदिराचे जे केंद्रीय कक्ष होते ते आता मशिदीचे केंद्रीय कक्ष आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होता. हे प्रवेशद्वार दगडांनी बंद करण्यात आला आहे. मशीद बनवताना मंदिराच्या अनेक खुणा मिटण्याचा प्रयत्न झाला असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

नेमके काय आहे रिपोर्टमध्ये

  • मशिदीच्या आधी, तिथे बांधलेल्या मंदिरात एक मोठा मध्यवर्ती कक्ष होता आणि उत्तर बाजूला एक लहान खोली होती.
  • मध्यवर्ती कक्ष आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या संरचनेचे मुख्य प्रवेशद्वार आहे.
  • मशिदीची पश्चिमेकडील खोली आणि पश्चिमेकडील भिंत आहे.
  • मशिदीच्या बांधकामादरम्यान, मंदिराच्या खांबांमध्ये तसेच इतर भागांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले. ज्यामुळे त्याला मशिदीचा आकार देण्यात आला.
  • विद्यमान संरचनेवर शिलालेख दिसून आले.
  • दगडांवर अरबी आणि पर्शियन शिलालेख आहे.
  • तळघरात शिल्पाचे अवशेष आहेत.

शिलालेखामध्ये देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी

ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी 32 शिलालेख सापडले. त्यात देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी मिळाली आहे. त्यावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर असे देवांचे नाव मिळाले. महा-मुक्तिमंडप यासारखे तीन शब्द शिलालेखांमध्ये मिळाले आहे. मंदिराचे अनेक शिलालेख मशीद बनवताना वापरल्याचे अहवालात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.