‘सर वाचवा…’, टेबल, खुर्चीखाली लपून महिला पोलिसांनी वाचवले प्राण, हल्द्वानीमध्ये भयंकर घडलं?

Haldwani Violence | कोर्टाच्या आदेशावरुन हे अतिक्रमण हटवलं जात होतं. मागच्या 15 दिवसांपासून हे अभियान सुरु होतं. गुरुवारी कारस्थान रचून पोलिसांना टार्गेट करण्यात आलं. गाड्या पेटवण्यात आल्या. हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला. 130 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत.

'सर वाचवा...', टेबल, खुर्चीखाली लपून महिला पोलिसांनी वाचवले प्राण, हल्द्वानीमध्ये भयंकर घडलं?
haldwani violence
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 12:19 PM

Haldwani Violence | उत्तराखंडच्या हल्द्वानी शहराने गुरुवारी 8 फेब्रुवारीला मोठा हिंसाचार अनुभवला. या हिंसेत दोघांचा मृत्यू झाला. 130 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. उपद्रवी समाजकंटकांनी पोलिसांना लक्ष्य केलं. पोलीस स्टेशनवर हल्ला केला. पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल, अधिकारी अचानक झालेल्या या हल्ल्यासमोर हतबल होते. या दरम्यान स्फोटाचे आवाज झाले. पोलीस स्टेशनवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. यामुळे एकाबाजूने आग लागली. एक महिला शिपाई वायरलेस सेटवरुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देत होती. ‘सर आम्हाला वाचवा’ ती बोलत होती, इतक्यात अचानक संर्पक तुटला. पोलिसांची अतिरिक्त कुमक पोहोचेपर्यंत पोलीस स्टेशन जळून खाक झालं होतं. या हिंसाचारात 100 पोलीस जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय.

पोलीस स्टेशनवर दगडफेक करण्यात आली. हे दगड पोलिसांना लागत होते. टेबल, खुर्चीखाली लपून पोलिसांनी आपले प्राण वाचवले. डीएम वंदना कुमार यांनी सांगितलं की, पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. जमाव पोलीस स्टेशनजवळ आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घातली नाही. पण समाजकंटकांनी दगडफेक चालू केली.

पोलीस कठोर पावल उचलू शकत होते, पण….

पोलीस स्टेशनबाहेर अनेक गाड्या उभ्या होत्या. मीडियाच्या गाड्या होत्या. जमावाने या गाड्या पेटवून दिल्या. छपरावरुन दगड टाकले जात होते. पोलीस जमावाविरुद्ध कठोर पावल उचलू शकत होते. पण वातावरण खराब होऊ नये, म्हणून पोलीस शांत राहिले.

प्रशासनाच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह

गुरुवारी दुपारी मलिक का बगीचा येथे बेकायद मदरसा आणि नमाज स्थळ तोडण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस पोहोचले. अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु झाल्यानंतर तासाभराने समाजकंटकांनी पोलीस टीमवर हल्ला केला. हिंसाचारात पोलीसच नाही, सर्वसामान्य लोकही जखमी झाले. या हिंसाचारानंतर प्रशासनाच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालय. बनभूलपुरा येथे बेकायद धार्मिक स्थळ तोडताना तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते, याची माहिती प्रशासनाला होती. पण याचा सामना करण्याची तयारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी का नाही केली?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.