भाजपकडून याही राज्यातील मुख्यमंत्र्याला नारळ मिळण्याची शक्यता, शेतकऱ्यांवरचं वादग्रस्त वक्तव्य ‘या’ नेत्याला भोवणार?

गुजरातनंतर आता हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा पत्ता कट होऊ शकतो. विशेष म्हणजे, मनोहरलाल खट्टर यांच्या खुर्चीला धोका असल्याचा इशारा खुद्द विधानपरिषदेचे आमदार विरेंद्र गुज्जर यांनी दिला आहे.

भाजपकडून याही राज्यातील मुख्यमंत्र्याला नारळ मिळण्याची शक्यता, शेतकऱ्यांवरचं वादग्रस्त वक्तव्य 'या' नेत्याला भोवणार?
भाजपने सत्तेत असलेल्या राज्यातील 4 मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता अजून एका राज्यातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाण्याची शक्यता आहे.
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 6:07 PM

नवी दिल्ली: भाजपने सत्तेत असलेल्या राज्यातील 4 मुख्यमंत्री बदलल्यानंतर आता अजून एका राज्यातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाण्याची शक्यता आहे. आणि हा बदल अवघ्या 8 ते 10 दिवसांत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातनंतर आता हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा पत्ता कट होऊ शकतो. विशेष म्हणजे, मनोहरलाल खट्टर यांच्या खुर्चीला धोका असल्याचा इशारा खुद्द विधानपरिषदेचे आमदार विरेंद्र गुज्जर यांनी दिला आहे. ( Haryana Chief Minister Manoharlal Khattar is likely to be removed from office. Impact of statements made on farmers )

दिल्ली सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन, त्यात हरयाणाच्या शेतकऱ्यांच्या असलेला सहभाग आणि त्यात लाखीमपूर शेतकरी मृत्यूनंतर मनोहरलाल खट्टर यांनी केलेलं वादग्रस्त विधान यामुळे राजकीय वर्तुळातून खट्टर यांच्यावर टीका होत आहे. त्यातच हरयाणाच्या शेतकऱ्यांमध्येही खट्टर यांच्याविरोधात रोष आहे. त्यामुळेच भाजप हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

विरेंद्र गुज्जर काय म्हणाले?

मनोहरलाल खट्टर यांच्याविषयी बोलताना विरेंद्र गुज्जर म्हणाले की, ‘खट्टर यांना आठवडाभरात, दहा दिवसांत हटवलं जाईल. कोणी कोणावर उपचार करत नाही. देशात लोकशाही आहे. तिनंच सगळ्यांचे उपचार होतात.’ गुज्जर यांना भाजपने काही दिवसांपूर्वी विधान परिषदेवर आमदार केलं आहे. त्यामुळे गुज्जर यांच्या बोलण्याला वजनही असल्याचं राजकीय विश्लेषक मानत आहेत.

काय म्हणाले होते मनोहरलाल खट्टर?

आपल्या विभागातील 500, 700, 1000 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करा. त्यांना स्वयंसेवक बनवा. आणि काठ्या हातात घेऊन जशास तसे उत्तर द्या. तुम्ही चिंता करू नका. फार काय तुम्ही एक महिना, तीन महिने किंवा सहा महिने तुरुंगात जाल. पण मोठे नेते व्हाल. तुमचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल, असं खट्टर म्हणाले.

काँग्रेसकडून खट्टर यांच्यावर टीका

काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही खट्टर यांच्यावर टीका केली होती. खट्टरजी तुम्ही भाजप कार्यकर्त्यांना आंदोलक शेतकऱ्यांवर हल्ला करायला सांगत आहात. शेतकऱ्यांवर हल्ला करा, तुरुंगात जा आणि नेते बनूनच बाहेर या, हा तुमचा गुरुमंत्र कधीच यशस्वी होणार नाही. संविधानाची शपथ घेऊन उघडपणे अराजकता पसरवणं हा देशद्रोह आहे. कदाचित मोदी, नड्डा यांची तुमच्या विधानाशी सहमती असेल, असा खोचक टोला सुरजेवाला यांनी लगावला होता.

हेही वाचा:

शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते, त्यांना जशास तसे उत्तर द्या; भाजपच्या ‘सीएम’चं ‘खट्टर’नाक विधान

शेतकऱ्यांना चिरडणं ही तुमची पॉलिसी आहे काय?, संजय राऊत मोदी-योगींवर तुटून पडले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.