भाजपला चूक महागात पडली, देशातील सर्वात श्रीमंत महिलेला तिकीट नाकारलं आणि…

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आता समोर येत आहे. या निवडणुकीत देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती. सावित्री जिंदाल यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे भाजपने त्यांना तिकीट नाकारलं होतं. जिंदाल यांच्या विजयामुळे त्यांना तिकीट नाकारणं ही भाजपची चूक होती हे सिद्ध झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भाजपला चूक महागात पडली, देशातील सर्वात श्रीमंत महिलेला तिकीट नाकारलं आणि...
देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल यांनी निवडणूक जिंकली
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 4:08 PM

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत हिसार मतदारसंघातून भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ख्यातनाम असलेल्या सावित्री जिंदल या विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपने सावित्री जिंदल यांना उमेदवारीचं तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे सावित्री यांनी अपक्ष उमेदवारी लढवत दणदणीत विजय संपादीत केला आहे. सावित्री जिंदल यांनी काँग्रेसचे उमेदवार राम निवास रारा यांना 20 हजार मतांनी पराभूत केलं आहे. फोर्ब्सच्या आकड्यांनुसार, सावित्री जिंदल यांची सप्टेंबर 2024 पर्यंत 3.65 लाख कोटी रुपयाची संपत्ती होती.

सावित्री जिंदल या जिंदल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी हिसार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या बँक खात्यात किती पैसे जमा आहेत, या विषयी माहिती दिली होती. त्या शपथपत्रानुसार, सावित्री जिंदल यांच्या बँक खात्यात 4.09 कोटी रुपये जमा आहेत. त्यांच्याकडे 165 कोटी रुपयांचे शेअर आणि जवळपास 20 कोटी रुपयांचे दागिने आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे जवळपास 80 कोटी रुपयांची शेतजमीन आहे.

भाजपने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष निवडणूक लढवली

सावित्री जिंदल यांचे पुत्र खासदार नवीन जिंदल यांनी मार्च महिन्यात भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी कुरुक्षेत्र येथून लोकसभा निवडणूक लढवत विजय संपादीत केला होता. नवीन जिंदल यांनी भाजपाच प्रवेश करताच तीन दिवसांनी माजी मंत्री सावित्री जिंदल यांनी भाजपात प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आपल्याला उमेदवारीचं तिकीट देईल, असं सावित्री जिंदल यांना वाटलं होतं. पण पक्षाने माजी खासदार तथा मंत्री डॉ. कमल गुप्ता यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या सावित्री जिंदल यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा आता विजय झाला आहे.

सावित्री जिंदल यांच्या विरोधात कोण-कोण होतं?

सावित्री जिंदल यांची हिसार विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, जजपा आणि आपच्या उमेदवारांसोबत लढाई होती. त्या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार कमल गुप्ता यांना पक्षाने पुन्हा संधी दिली होती. तर काँग्रेसकडून राम निवास रारा हे उमेदवार होते. तर जजपाकडून रवि अहूजा आणि आम आदमी पक्षाकडून संजय सतरोदिया उमेदवार होते. अखेर या मतदारसंघाचा निकाल आता समोर आला आहे. सावित्री जिंदल यांचा तब्बल 20 हजार मतांनी विजय झाला आहे.

सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.
शिंदेंचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, मंत्रिमंडळ बैठकही कॅन्सल, कारण काय
शिंदेंचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, मंत्रिमंडळ बैठकही कॅन्सल, कारण काय.
हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसची पिछेहाट, कोणाला किती जागांवर आघाडी?
हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसची पिछेहाट, कोणाला किती जागांवर आघाडी?.
हरियाणात गेम पलटला, भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल
हरियाणात गेम पलटला, भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल.
संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?
संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?.