शमीलाच मॉडेलिंग नको होती, पापाजींनी तर माझ्यावर… हसनी जहांचे पुन्हा गंभीर आरोप
प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद शमी याची विभक्ती पत्नी हसीन जहां पुन्हा एकदा चर्चेत आली. वर्ल्ड कप दरम्यान हसीनने मोहम्मद शमीबाबत पोस्ट केली होती. तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती. या व्हायरल झालेल्या पोस्टची चर्चाही रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हसीन चर्चेत आली आहे. यावेळीही ती एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अर्थातच ही पोस्ट शमीवर हल्ला करणारी आहे, हे सांगायला नको.
नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याची विभक्त पत्नी हसीन जहां यांच्यातील तू तू मैं मैं अजून काही संपलेली दिसत नाही. दोघांमध्ये अजूनही आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. हसीन जहांने तर पुन्हा एकदा मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे 2023च्या वर्ल्डकप दरम्यान तिने सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तिच्या या पोस्टची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर तिने पुन्हा एकदा एक पोस्ट करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
हसीन जहांने मोहम्मद शमीवरून इन्स्टाग्रामवर पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने मोहम्मद शमीनेच तिचं करिअर बर्बाद केल्याचा आरोप केला आहे. हसीनने या पोस्टमध्ये मॉडेलिंगबाबत आपली भावना व्यक्त केली आहे. हसीनने एका बातमीचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. हसीन जहांच्या मॉडेलिंगला तिच्या सासऱ्याने विरोध केला होता, अशी बातमी असलेलं हे कात्रण आहे. मात्र, हसीनने या वृत्ताचं खंडन केलंय. माझे सासरे मॉडेलिंगच्या विरोधात नव्हते. मॉडेलिंगच्या विरोधात फक्त मोहम्मद शमी होता, असं तिने म्हटलंय.
पापाजींनी कधीच म्हटलं नाही
मी मॉडेलिंग सोडावं असं मला पापाजींनी कधीच म्हटलं नव्हतं. मी मॉडेल होते म्हणूनच पापाजीने माझा सून म्हणून स्वीकार केला. मॉडेल सून मिळावी म्हणून त्यांनी देवाजवळ प्रार्थनाही केली होती. पण माझ्या आयुष्यासाठी ही दुवा बद्दुआ ठरलीय. पापाजींचं माझ्यावर खूप प्रेम होतं, पापाजींनी तर कधीच माझ्यावर मॉडेलिंग सोडण्याची जबरदस्ती केली नाही, असं हसीनने म्हटलंय.
मी मूर्ख बनत गेले
फक्त मोहम्मद शमीला माझ्या मॉडेलिंगचा त्रास व्हायचा. त्याने माझं करिअर बर्बाद केलं. मी फिल्म इंडस्ट्रीच्या संपर्कात राहिले तर त्याचे कारनामे मला कळतील अशी त्याला भीती होती. मला एक अबला नारी बनवण्याचा त्याचा डावा होता. आणि मीही त्याच्या जाळ्यात अडकून मूर्ख बनत गेले, असं ती म्हणाली.
लवकरच दुसरी वहिनी…
दरम्यान, हसीनच्या या पोस्टवर तिच्या आणि शमीच्या फॅन्सनी प्रतिक्रिया दिली आहे. शमी सर मॉडेलिंगच्या विरोधात नव्हते. तर इस्लाम मॉडेलिंगच्या विरोधात आहे. तुमच्या सुरक्षेसाठीच ते असं म्हणत होते, असं अली नावाच्या एका यूजर्सने म्हटलंय. तर, शमी भाईची इंग्लिश लवकरच सुधारणार असं दिसतंय. मग लवकरच चांगली वहिनी येईल. त्यावेळी आम्ही खूप डान्स करू, असं दुसऱ्या यूजर्सने म्हटलंय. तर बंद करा. आम्हाला शमीचा अभिमान वाटतोय. शमी आपल्या देशाची शान आहे, असं एकाने लिहिलंय.