Hathras | मुलींसह मुलांवरही संस्काराची गरज; स्मृती इराणींचा भाजप नेत्याला घरचा आहेर
हाथरस प्रकरणानंतर मुलींना संस्कारांची गरज आहे, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदाराला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घरचा आहेर दिला आहे.
नवी दिल्ली : हाथरस आत्महत्या प्रकरणावर बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेंद्र सिंह यांच्यावर टीका होत आहे. बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, ‘सगळ्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार द्यायला हवेत. तेव्हाच बलात्कारासारख्या घटना थांबतील.’ आमदारांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी समाचार घेतला आहे. (Hathras – The need for rites on girls as well as boys says Smriti Irani)
स्मृती इराणी म्हणाल्या की, हाथरस प्रकरणानंतर काही जण मुलींना उपदेश देत आहेत. ते म्हणातात की, मुलींना संस्काराची गरज आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छिते की कुटुंबासाठी मुलगा आणि मुलगी हे एक असून दोन्ही मुलांवर चांगले संस्कार करणे ही पालकांची जबाबदारी आहे.
इराणी म्हणाल्या की, हाथरस प्रकरणाने मी खूप अस्वस्थ झाले आहे. याबाबत मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मला आश्वस्त केले आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी गठित केली. त्यानंतर आता हे प्रकरण सीबीआयला सोपवले. लवकरच त्याचे सत्य समोर येईल.
काय म्हणाले होते सुरेंद्र सिंह?
भाजप आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, “मी केवळ एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतोय आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात.
#WATCH Incidents like these can be stopped with help of good values, na shashan se na talwar se. All parents should teach their daughters good values. It’s only the combination of govt & good values that can make country beautiful: Surendra Singh, BJP MLA from Ballia. #Hathras pic.twitter.com/47AmnGByA3
— ANI UP (@ANINewsUP) October 3, 2020
बलात्कारानंतर गळा आवळून हत्येचा प्रयत्न
यूपीच्या हाथरस (Hathras) जिल्ह्यात राहणारी मुलगी, 14 सप्टेंबर रोजी शेतात काम करत असताना, चार नराधमांनी तिला खेचत बाजूला नेले. नराधमांनी आधी पीडितेवर सामूहिक अत्याचार (GangRape) केला. मग तिच्या पाठीचा मणका मोडला. इतक्यावर ते थांबले नाहीत. बोलता येऊ नये म्हणून पीडितेची जीभही छाटली. तिच्याच ओढणीने तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. ती मृत झाल्याचे समजून तिला शेतात सोडून पळून गेले. आई आणि भावाने शोधाशोध केल्यावर ती शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडली.
पीडितेच्या गळ्यात तीन फ्रॅक्चर झाले होते. 15 दिवसांपर्यंत ती इशाऱ्यांत आपल्या असह्य वेदना मांडत होती. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे तिने शेवटचा श्वास घेतला. 22 सप्टेंबरला रुग्णालयात जबाब नोंदवताना कसेबसे तिने आपबीती सांगितली. तिने दिलेल्या जबाबावरून चारही नराधमांच्या मुसक्या बांधण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारकडून पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
उत्तर प्रदेश पुन्हा बलात्काराने हादरलं, मेरठमध्ये आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
निर्भयाची वकील हाथरस पीडितेची केस लढणार, यूपी पोलिसांनी कुटुबियांना भेटण्यापासून रोखले
न्याय होईपर्यंत लढतच राहू; हाथरसमधून प्रियांका गांधींनी योगी सरकारला ललकारले
(Hathras – The need for rites on girls as well as boys says Smriti Irani)